Jal Jivan Scheme
Jal Jivan Scheme Agrowon

Jal Jivan Mission : ‘जल जीवन’ची कामे मार्चअखेर पूर्ण करा

Water Supply Scheme : ‘‘जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आराखड्यात नमूद केलेल्या उपाययोजनेची वेळेत अंमलबजावणी करावी.
Published on

Pune News : ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी व तेथील जीवनमान उंचावण्यासाठी जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत करण्यात येणारी कामे मार्च २०२४ अखेर पूर्ण कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, ग्रामीण पाणीपुरवठा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या नियोजन अधिकारी सुनेत्रा पाटील आदी उपस्थित होते.

Jal Jivan Scheme
Jal Jivan Mission : ‘जलजीवन’च्या ९५ योजनांच पूर्ण

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आराखड्यात नमूद केलेल्या उपाययोजनेची वेळेत अंमलबजावणी करावी. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. कामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे.’’

वनविभाग, गायरान, पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, वैयक्तिक मालकी जागा व इतर जागा अडचणीबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून जागा हस्तांतरित करून घ्याव्यात, कामांची गती वाढवावी. पिण्याच्या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी.

Jal Jivan Scheme
Jal Jivan Mission : जलजीवन मिशनच्या कामांबाबत सदस्य आक्रमक

वैयक्तिक मालकी असलेल्या जागेचे दानपत्र करून घ्यावे.राज्य विद्युत मंडळाकडून प्रलंबित जोडण्यासाठी आवश्यक अर्ज भरून द्यावेत. कामे सुरू होऊन नंतर बंद पडली आहेत अशी कामे तातडीने पुन्हा सुरू करावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यात १ हजार २३० योजना सुरू आहेत. जल जीवन मोहिमेअंतर्गत सुरु असलेली सर्वच कामे वेळेत पूर्ण करण्याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. कामाबाबत काही अडचण असल्यास वरिष्ठांना अवगत करावे. पाईपलाईनची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत,’’ असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com