Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : रब्बी हंगामातील गहूसह इतर पिके करपू लागली

Climate Change : गंगापूर तालुक्यातील अमळनेर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने पिकांना फटका बसला आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : गंगापूर तालुक्यातील अमळनेर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने पिकांना फटका बसला आहे. या बदलत्या वातावरणाने रब्बी हंगामातील गहूसह इतर पिके करपू लागली आहेत.

करपा, मर आणि मावा रोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याची दखल घेत कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे व विषय विशेषज्ञ डॉ. संजूला भवार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन पाहणी करत मार्गदर्शन केले.

२६ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीत ओलावा झाला. त्यामुळे तब्बल १५ ते २० दिवस रब्बी पेरणी पुढे लांबली. तसेच बदलत्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा, ही पिके मर होऊन करपू लागली आहेत. याचा सर्वाधिक फटका गोदावरी नदी काठच्या अमळनेर, कायगाव व इतर भागाला बसला आहे.

परिणामी जामगाव, भेंडाळा महसूल मंडळातील अनेक गाव शिवारातील गहू करपू लागले आहेत. महागडे कीटकनाशके, बुरशीनाशक, टॉनिक औषधी फवारणी करून ही रोग नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, त्या पिकांची वाढ खुंटली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. बदलत्या हवामानाच्या फटक्याने शेतकऱ्यांच्या हातून पीक जातात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

याची दखल घेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रम समन्वयक कृषी शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे, विषय विशेषज्ञ डॉ. संजूला भवार यांनी नुकतेच अमळनेर वस्ती येथील शकील पठाण यांच्या करपलेल्या गहू पिकाची पाहणी करून मार्गदर्शन केले.

या वेळी श्री. झाडे म्हणाले, की दिवसा कडक ऊन, रात्री आणि पहाटे वातावरणात गारवा, तर कधी ढगाळ वातावरणामुळे गहू पिकासाठी पोषक वातावरण निर्माण होत नसल्याने रोगराईचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांनी करपा पडणाऱ्या गहू पिकावर बुरशीनाशकांची आणि आंतरप्रवाही औषध फवारणी करावी. गव्हाला कमी प्रमाणात पाणी देऊन ताण द्यावे. पुढे गादी वाफ्यावर गहू पेरणी करावी. जर गव्हाला जास्त पाणी झाले तर गहू पिवळे पडत नाही असे म्हटले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Fourth List: कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Fodder Self Sufficiency: दुष्काळात तोंगलाबादचा ‘चारा स्वयंपूर्णतेचा आदर्श ‘पॅटर्न’

Village Development Committees: स्थापन करा दुष्काळ आकलन, निवारण ग्रामविकास समिती

Farmer Issue: दुष्काळातही शेतकऱ्यांवर अन्याय!

Digital Agriculture Policy: डिजिटल सुसूत्रीकरणाचे स्वागतच!

SCROLL FOR NEXT