Cashew Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Cashew Production : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खांबाळे येथील सुनील गणपत पवार यांची १३ एकर जमीन आहे. यातील सहा एकरांत काजूच्या वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात या जातींच्या ७०० झाडांची लागवड केली आहे.

एकनाथ पवार

Cashew Farming Management : शेतकरी नियोजन

पीक : काजू

शेतकरी : सुनील गणपत पवार

गाव : खांबाळे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

एकूण क्षेत्र : १३ एकर

काजू लागवड : सहा एकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खांबाळे येथील सुनील गणपत पवार यांची १३ एकर जमीन आहे. यातील सहा एकरांत काजूच्या वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात या जातींच्या ७०० झाडांची लागवड केली आहे. या वर्षी पालवी आणि मोहोर येण्यास दरवर्षीच्या तुलनेत उशीर झाला. टप्पाटप्प्याने मोहर येत गेला. त्यामुळे यंदाचा काजू हंगाम फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. सध्या काजू हंगाम अंतिम टप्प्यात आहे.

मागील कामकाज :

साधारण नोंव्हेंबरमध्ये पालवी आल्यानंतर टी मॉस्किटो बग या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली. या वर्षी बागेत या किडीचे प्रमाण अधिक होते. त्यासाठी पहिल्या फवारणीनंतर साधारण १५ दिवसांनी दुसरी फवारणी घेतली.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडीचे प्रमाण वाढले होते. या काळात झाडांना पालवी फुटण्यास सुरुवात झाली. त्यानंतर झाडांना मोहर आला. परंतु जानेवारी महिन्यात चार ते पाच दिवस पाऊस झाला. अवकाळी पावसाचा आलेल्या मोहरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता होती. त्यासाठी मोहर टिकवून ठेवण्यासाठी रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी घेतली.

या वर्षी बागेतील झाडांवर टप्पाटप्प्याने मोहोर येत गेला. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील झाडांवर अल्प मोहर दिसून आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील झाडांवर काही प्रमाणात आणि पुढे तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण बागेतील झाडांवर चांगला मोहर आला.

साधारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काजू बी परिपक्व होण्यास सुरुवात झाली. झाडांवर पूर्ण परिपक्व होऊन जमिनीवर पडलेले काजू बी गोळा करून त्याची प्रतवारी केली. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन बी कोवळ्या उन्हात वाळवली जाते. दोन, तीन कोवळी उन्हे दिल्यानंतर काजू बी पॅकिंग करून ठेवली जाते.

हंगाम सुरू झाल्यानंतर दर चार ते पाच दिवसांनी काजू बी गोळा करण्याची कार्यवाही केली जाते. सध्या काजू हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. परंतु झाडांच्या पालापाचोळ्यात पडलेले काजू बी गोळा करण्याचे काम पुढील आठ ते दहा दिवस चालू राहील.

आगामी नियोजन :

काजू गोळा करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बागेच्या स्वच्छतेची कामे करण्यावर भर दिला जाईल. काजू झाडाखाली पडलेला पालापाचोळा गोळा करून झाडाच्या बुंध्यात घातला जाईल. साधारण मे अखेरपर्यंत सर्व पालापाचोळा झाडाच्या बुंध्यावर रचण्याचे काम पूर्ण केले जाईल. जेणेकरून पाऊस सुरू झाल्यानंतर पालापाचोळा कुजून जातो. त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो शिवाय जमीन देखील भुसभुशीत राहते.

जून महिन्यामध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात झाडांना सेंद्रिय खत आणि गांडूळ खत दिले जाते. परंतु या वर्षी पाऊस लांबल्यामुळे जुनच्या अखेरीस झाडांना खतमात्रा दिली. प्रतिझाड चार ते पाच किलो सेंद्रिय खत देण्यात आले.

शिवाय झाडाखाली पडलेला सर्व पालापाचोळा खत घालताना तो चरामध्ये घातला होता. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये भातपिकासह शेतातील इतर कामांस सुरुवात होते. तसेच पाऊस जास्त असल्यामुळे काजू बागेत कोणताही कामे करणे शक्य होत नाही.

सप्टेंबरनंतर बागेत वाढलेली झाडेझुडपे तोडून बाग स्वच्छ केली जाते. या वर्षी पाऊस नोव्हेंबरपर्यत लांबला होता. त्यामुळे बागेत नियोजनानुसार कामे करता आली नाहीत. मात्र नोव्हेंबरमध्ये संपूर्ण बाग स्वच्छ करून घेतली. काजू बागेत तण नियत्रंणासाठी तणनाशकांचा वर्षातून एक वेळ वापर केला जातो.

त्यानंतर गवत आल्यास ग्रासकटरने तणनियंत्रण केले जाते. नोव्हेंबरमध्ये बागेभोवती माळरानावर मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत वणवा लागण्याची शक्यता असते. त्यासाठी बागेभोवती आगरेषा आखणी केली जाते. आगरेषा आखणी सायंकाळच्या वेळी करण्यात येते.

सुनील पवार, ९४२१९२४४२७

(शब्दांकन : एकनाथ पवार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT