Soyabean Agrowon
ॲग्रो विशेष

Soyabean Market Rate : खानदेशातील बाजारांत सोयाबीनची आवक घटली ; दर ४२५० ते ४५१५ रुपये प्रतिक्विंटल

Soyabean Market Price Update : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात सोयाबीनची आवक काहीशी कमी आहे. दर किमान ४२५० ते कमाल ४५००, ४५१५ व सरासरी ४४९० रुपये प्रतिक्विंटल, असे अनेक बाजारांत मिळाले आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात सोयाबीनची आवक काहीशी कमी आहे. दर किमान ४२५० ते कमाल ४५००, ४५१५ व सरासरी ४४९० रुपये प्रतिक्विंटल, असे अनेक बाजारांत मिळाले आहेत. मागील दोन दिवसात काही बाजारांत दरात किंचित सुधारणा दिसून आली.

सोयाबीनसाठी खानदेशात धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारातील नंदुरबार, शहादा, जळगावमधील जळगाव, अमळनेर, चोपडा, पाचोरा-भडगाव या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. सोयाबीनचे दर मध्यंतरी ४१०० ते ४३०० रुपये व सरासरी ४२०० रुपये प्रतिक्विंटल, असे खाली आले होते.

परंतु दरांत मागील दोन दिवसांत काहीशी सुधारणा झाली आहे. चोपडा येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १७) ४० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तेथे दर किमान ४२५२ कमाल ४५१५ व सरासरी ४४८७ रुपये प्रतिक्विंटल, असा मिळाला. कुठेही कमाल दर ४५५० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला नसल्याचे दिसून आले.

जळगाव, अमळनेर, शिरपूर, नंदुरबार येथील बाजारांतही सोयाबीनची आवक कमी झाली. चोपडा येथील बाजार समितीत मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी १५० क्विंटल आवक झाली. जळगाव येथील बाजारात मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी २१० क्विंटल आवक झाली.

अमळनेरातील आवकही प्रतिदिन सरासरी १८० क्विंटल एवढी होती. परंतु या आठवड्यात जळगाव, चोपडा, अमळनेरातही आवक कमी झाली आहे. चोपडा येथील आवकेत कमालीची घट झाली आहे.

दरातील घसरण व अधिकची आवक यामुळे अनेकांनी चोपडा येथे सोयाबीनची पाठवणूक टाळल्याचा मुद्दाही चर्चेत आहे. परंतु जळगाव येथील आवक मागील दोन दिवसांत सरासरी १८० क्विंटल झाली. अमळनेरातील आवकही प्रतिदिन सरासरी १५० क्विंटलवर राहिली, अशी माहिती मिळाली. काही बाजार समित्यांत कमाल दर ४५०० रुपयांवर पोहोचले आहेत.

परंतु जळगाव येथील बाजार समितीत कमाल दर ४४८० रुपये प्रतिक्विंटल नोंदविण्यात आला. सोयाबीनची मळणी मागील पंधरवड्यात वेगात झाली. जशी मळणी झाली, तशी लागलीच त्यास वाळवून बाजारात शेतकऱ्यांनी पाठवणूक केली. मळणी, कापणीच्या काळात पाऊस नव्हता. यामुळे सोयाबीनचा दर्जा चांगला आहे. परंतु दर अपेक्षित मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

khandesh Water Projet : चाळीसगावातील मन्याड प्रकल्प अल्पावधीत ७५ टक्के भरला

Crop Loan : खानदेशात पीक कर्ज वितरणात राष्ट्रीयीकृत बँका मागे

Agrowon Podcast: हरभऱ्याचे दर कायम, कापूस दबावात, कांद्याची आवक स्थिर, मोहरीला मागणी तर जिऱ्याचे भाव टिकून

Irrigation Project Khandesh : पाडळसे, बुराईसह अनेक सिंचन प्रकल्पांचे भिजत घोंगडे

India Vice President Election: इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी यांची उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर

SCROLL FOR NEXT