
Cotton News : कापसाचे कमाल भाव काही बाजारांमध्ये आता ८ हजारांवर पोचला. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही बाजारांमध्ये हा भाव मिळाला. ऑगस्ट महिन्याच्या सरुवातीपासूनच कापसाच्या भावात वाढ होत गेली. देशातील वायद्यांमध्येही कापूस वाढला. तसचं हा भाव टिकून राहण्याचाही अंदाज आहे.
देशातील बाजारांमध्ये कापूस आवक घटली आहे. शेतकऱ्यांनी एप्रिलपासून बाजारात आवक वाढवली होती. कापसाची आवक जास्त असल्याने दरावर दबाव होता. जुलैपर्यंत कपूस ७ हजारांपेक्षा जास्त विकला गेलाच नाही. परिणामी शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली. चालू हंगामात कापूस मागे ठेऊनही शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. पण ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच कापसाच्या भावात सुधारणा होत गेली.
सोमवारपासून कापूस दर आणखी वाढले. आज काही बाजारांमध्ये कापूस भावाने ८ हजारांचाही टप्पा पार केला. राज्यातील सेलू आणि इतर दोन बाजारांमध्ये हा भाव मिळाला. सेलू बाजारात कमाल भाव ८ हजार ४० रुपये होता. तर कर्नाटकातील काही बाजारांमध्ये ८ हजाराने कापसाचे व्यवहार झाले. पण ८ हजार हा कमाल भाव होता. सरासरी भावपातळी यापेक्षा कमीच होती. कापसाचा सरासरी भाव ७ हजार २०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर कमाल भाव आजही ६ हजार ५०० रुपयांपासून सुरु झाले.
…………..
वायद्यांमधील भाव
बाजार समित्यांसोबतच वायद्यांमध्येही कापसाच्या भावात वाढ झाली. कापूस वायदे ६० हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. वायद्यांमध्ये रुईचे भाव होतात. तसेच वायदे खंडीमध्ये होतात. एका खंडीमध्ये ३५६ किलो रुई असते. आज ऑगस्टच्या वायद्यांमध्ये नरमाई आली होती. वायदे ६० हजार ४४० रुपयांवर होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. आज सायंकाळपर्यंत कापसाचे वायदे ८५ सेंट प्रतिपाऊंडवर होते
भाव टिकतील का?
यापुढील काळातही कापूस दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज आहे. देशातील कापूस लागवड गेल्यावर्षीपेक्षा केवळ एक टक्क्याने पिछाडीवर आहे. देशात आतापर्यंत १२१ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली. पण यंदा पाऊसमान पिकाला पोषक नाही. ऑगस्टचाच विचार करता मागील दोन ते तीन आठवडे पावसाचा खंड आहे. तर लागवीडलाही उशीर झाला. या सर्व परिस्थितीचा कापूस पिकाला फटका बसू शकतो, असा अंदाज आहे.
…………..
पुढे काय घडेल?
इतर देशांमध्येही कापूस पिकाची स्थिती चांगली नाही. परिणामी यंदा कापूस पिकाला चांगल्या भावाची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात कापूस भाव वाढतील, असा अंदाज याआधीच दिला होता. आता पुढील काळात कापूस दरातील वाढ कायम राहू शकते, असा अंदाजही कापूस बाजारातील अभ्यासकांनी दिला
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.