Soybean Market : हिंगोली बाजार समितीत सोयाबीन दर दबावातच

Soybean Market Rate : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारात (भुसार मार्केट) सोयाबीनचे दर गेल्या काही दिवसांपासून दबावातच आहेत.
Soybean
SoybeanAgrowon

Hingoli News : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारात (भुसार मार्केट) सोयाबीनचे दर गेल्या काही दिवसांपासून दबावातच आहेत. किमान व कमला दरात घसरण कायम आहे.

Soybean
Soybean Market: जागतिक सोयाबीन पुरवठा यंदाही जास्तच राहणार

शनिवारी (ता. १५) सोयाबीनची २८० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४५९५ ते कमाल ४८७० रुपये तर सरासरी ४७३२ रुपये दर मिळाले.

हिंगोली धान्य बाजारात मंगळवार (ता. ११) ते शनिवार (ता. १५) या कालावधीत सोयाबीनची १८६० क्विंटल आवक झाली.

Soybean
Cotton Soybean Market : कापूस, सोयाबीन वगळता सर्व पिकांमध्ये दरवाढ

सरासरी ४७३२ ते ४८७७ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १४) सोयाबीनची ३०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४६०० ते कमाल ४९६० रुपये तर सरासरी ४८३० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १३) सोयाबीनची २५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ४९५५ रुपये तर सरासरी ४८७७ रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. १२) सोयाबीनची २३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४७०० ते कमाल ४९५१ रुपये तर सरासरी ४८२० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. ११) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४६९५ ते कमाल ४९६२ रुपये तर सरासरी ४८२८ रुपये दर मिळाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com