Cashew Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Farming : सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूचा हंगाम बहरात

Cashew Production : लांबलेल्या पाऊस आणि त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये जाणवलेली थंडीची उणीव यामुळे यावर्षीचा काजू हंगाम एक महिना लांबणार हे निश्चित मानले जात होते.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात काजू बी परिपक्व होण्यास दोडामार्ग आणि किनारपट्टी भागात सुरुवात झाली आहे. मात्र उर्वरित भागातील शेतकऱ्यांना अद्याप २० ते २५ दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र नव्या काजू हंगामाची चाहुल लागल्याने बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

लांबलेल्या पाऊस आणि त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये जाणवलेली थंडीची उणीव यामुळे यावर्षीचा काजू हंगाम एक महिना लांबणार हे निश्चित मानले जात होते. त्यातच डिसेंबरमध्ये निर्माण झालेले पावसाचे वातावरण आणि सतत असलेले ढगाळ वातावरण यामुळे काजू बागायतदारांना मोहर संवर्धन करताना नाकीनऊ आले.

मात्र तरीदेखील अनेक शेतकऱ्यांनी वातावरण बदलाचा सामना करीत पहिल्या टप्प्यातील मोहरांचे संवर्धन केले. दोडामार्ग आणि किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये इतर भागांच्या तुलनेत पंधरा ते वीस दिवस मोहर आला.

या मोहराची काजू बी आता परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे. दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांमध्ये काजू बी परिपक्व होऊ लागली आहे. या भागात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे काजू हंगामासमोर आव्हान उभे राहिले होते. मात्र अतिशय उत्तम व्यवस्थापन केल्यामुळे काजू बीने आकार घेतला आहे.

काजू बागायतदारांमध्ये उत्साह

पुढील आठ ते दहा दिवसांत काजू बी परिपक्व होण्याचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. तर वैभववाडी, कणकवली, कुडाळ तालुक्यांत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून नियमित हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. हंगामाची चाहुल लागल्याने काजू बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement Stop: कापूस संकटात; सीसीआयची  खरेदी आजपासून बंद, मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतरही मुदतवाढ नाही

Single Women Survey: मराठवाड्यात ग्रामपंचायतस्तरावर ४.९३ लाख एकल महिलांची नोंद

Delhi Excise Policy Case : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल, सिसोदिया निर्दोष, अश्रू अनावर

Warehouse Receipt: बुर्किना फासो गोदाम पावतीवर व्यवहार

Water Conservation: वृक्षारोपण, जलसंवर्धनाचा प्रोत्साहक योद्धा

SCROLL FOR NEXT