Raju Shetti Agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti News : ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानीचा 'आक्रोश', राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शिरोळमधून पदयात्रेला सुरुवात

Sugarcane Second Installment : उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आक्रोश पदयात्रेला आज शिरोळपासून सुरुवात झाली.

Swapnil Shinde

Kolhapur News : मागील हंगामात गाळप केलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रति टन ४०० रूपये देण्याच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज शिरोळ, जि. कोल्हापूर येथील दत्त कारखान्यापासून आक्रोश पदयात्रेला सुरुवात झाली. ही पदयात्रा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ कि.मी काढण्यात येणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांनी मागील वर्षी गाळप केलेल्या उसाला एफआरपी प्रमाणे दर दिला आहे. परंतु, पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा ५६१ रुपये अधिकचा दर देण्याचा निर्णय घेतला.

सध्या साखरेचे बाजारभाव ३८०० रुपये असल्याने कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी अधिक ४०० रुपये दर जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रणशिंग फुंकले.

जोपर्यंत साखर कारखाने एफआरपी अधिक ४०० रूपयांचा हप्ता जाहीर केली जात नाही. तोपर्यंत एकाही साखर कारखान्याची धुरांडी पेटू देणार नाही
माजी खासदार, राजू शेट्टी

शिरोळ येथील दत्त कारखाना स्थळावरून माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते व शेतकरी यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात झाली. कार्यकर्त्यांनी कारखाना प्रशासनाच्याविरोधात घोषणाबाजी देत ही यात्रा पुढे सुरू झाली.

ढोल तालाच्या तालावर ठिकठिकाणी या यात्रेचे स्वागत करण्यात आले. ही यात्रा एकूण २२ दिवस आणि ५२२ किलोमीटर असणार आहे. ती ३७ साखर कारखान्यांवर जाणार आहे. त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २२ वी ऊस परिषद पार पडणार आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बच्चू कडूंचा पत्रयात्रेला पाठिंबा

दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे सोमवारी सातारा येथे दिव्यांग कल्याण अभियानासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी सांगली जाऊन राजु शेट्टी यांची भेट घेतली. तसेच शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्राला पाठिंबा जाहीर करत शेट्टींना आसूड भेट दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT