Farmer Protest
Farmer ProtestAgrowon

Sugarcane FRP : ऊस आंदोलनाची पडली ठिणगी! शेतकरी संघटनेने सांगलीत रोखली साखर वाहतूक

Sugar Transport : यंदाच्या हंगामात गाळप उसास प्रति टन ५ हजार रुपये द्यावेत या मागणीसाठी रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मुंबईला जाणारी साखर वाहतूक सांगलीत रोखली.

Sangli News : गेल्‍या हंगामात गाळप झालेल्या उसास प्रति टन पाच हजार रुपये द्यावेत या मागणीसाठी रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. १६) रात्री ९ च्या सुमारास बेळगावकडून वाडा मुंबईकडे जाणारा साखरेचा भरलेला ट्रक आशियाई महामार्गावरील येडेनिपाणी - कामेरी दरम्यान (जि. सांगली) रोखला.

Farmer Protest
Sugarcane FRP Raju Shetti : राजू शेट्टींची आक्रोश पदयात्रा उद्यापासून, शेतकऱ्यांची ताकद दाखवण्यासाठी साखर कारखानदारांच्या दारात

कारखान्यातून साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रक अडवले. जोपर्यंत एफआरपीची रक्कम जाहीर करत नाही, तोपर्यंत आम्ही साखर वाहतूक करू देणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेत साखर भरलेला ट्रक परत कारखान्यास नेण्‍यास भाग पाडला.

यावेळी जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील, शेतकरी संघटना सरचिटणीस धनपाल माळी, युवा आघाडी अध्यक्ष प्रणव पाटील, वाळवा तालुकाध्यक्ष लक्ष्मण पाटील, केतन जाधव, अशोक माळी, बाळासो मगदूम, विनोद चव्हाण, वैभव दाइंगडे, कृष्णात पाटील, दीपक पवार, अविनाश चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जोपर्यंत कोल्हापूर, सांगली, सातारा सर्व कारखानदार मागील वर्षीच्या गाळप केलेल्या ऊसाला दिवाळी आधी एक हजार रुपये, चालू होणाऱ्या गळीत हंगामात प्रति टन पाच हजार रुपये भाव द्यावा, तसेच दोन साखर कारखान्यामधील अंतराची अट रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच जोपर्यंत ही रक्कम मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही साखर कारखान्याची साखर वाहतूक करू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com