Jayram Rathod Agrowon
ॲग्रो विशेष

Hirda Rate : हिरड्याला आधारभाव देण्याच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे

Jayram Rathod : १५ फेब्रुवारीपर्यंत बाळ हिरडा आधारभाव जाहीर केले जातील, असे या वेळी मान्य करण्यात आले. आदिवासी विकास विभागाचे महाव्यवस्थापक जयराम राठोड यांनी याबाबत लेखी दिले.

Team Agrowon

Nagar News : राजूर (ता. अकोले) येथे हिरडा, पाणी, वीज व बुडीत बंधाऱ्याप्रश्‍नी किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन मंगळवारी (ता. ९) पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले. बाळ हिरड्याची सरकारी खरेदी येत्या हंगामात सुरू केली जाईल.

राजूर, कोतुळ व शेंडी येथे स्वतंत्र हिरडा बाजार सुरू करण्यात येईल. १५ फेब्रुवारीपर्यंत बाळ हिरडा आधारभाव जाहीर केले जातील, असे या वेळी मान्य करण्यात आले. आदिवासी विकास विभागाचे महाव्यवस्थापक जयराम राठोड यांनी याबाबत लेखी दिले.

भंडारदरा धरणातील पाणी आदिवासी शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी मिळावे, या साठी भंडारदरा धरणात बुडित बंधारे बांधण्यात येतील, यासाठीचा सर्वेक्षण प्रस्ताव तयार झाला आहे. याबाबतची प्रस्ताव प्रत किसान सभेला सादर करण्यात आली.

आदिवासी भागातील अनेक रस्त्यांचे प्रस्ताव या वेळी मंजूर करण्यात आले. वाड्यावस्त्यांचे रस्ते, वीज, पिण्याचे पाणी याविषयी मागण्या मार्गी लावण्यात आल्या. बैठकीत तालुक्याचे तहसीलदार सतीश थेटे, गटविकास अधिकारी कोल्हे,

आदिवासी प्रकल्प अधिकारी राजन पाटील आदी सहभागी झाले. डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभिरे, भीमा मुठे, सतीश भांगरे, स्वप्नील धांडे आदींनी चर्चेत भाग घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT