अमळनेरमधील पांणंद रस्त्यांचे प्रस्ताव धुळखात

वावडे, ता. अमळनेर : ‘शेत तिथे पांदण रस्ता’ ही सरकारची घोषणा गेल्या दहा वर्षांपासून कागदावरच राहिली आहे. शेत रस्त्याअभावी शेतातील कापूस घरी आणावा कसा, याचीच चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
Proposals for Panand Roads in Amalner
Proposals for Panand Roads in Amalner
Published on
Updated on

वावडे, ता. अमळनेर : ‘शेत तिथे पांदण रस्ता’ ही सरकारची घोषणा गेल्या दहा वर्षांपासून कागदावरच राहिली आहे. शेत रस्त्याअभावी शेतातील कापूस घरी आणावा कसा, याचीच चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. कापसाचा हंगाम १५ दिवसांवर आला असताना अजूनही शेतरस्त्यावर दोन ते तीन फूट चिखल आहे. त्यामुळे पांदण रस्त्याची योजना सरकारने गुंडाळली की काय, असा प्रश्न आहे. 

वावडेसह परिसरात काळी कसदार जमीन आहे. यावर्षी पावसाळा समाधानकारक झाला तरी गेल्या १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. परिणामी, सगळ्या शेतरस्त्यावर गुडघाभर चिखल साचला आहे. हा चिखल पावसाने आतापासून उघडीप दिली तरी किमान एक महिना सुकणारा नाही. त्यामुळे १५ दिवसांवर आलेला सोयाबीनचा हंगाम धोक्यात आला आहे. कापूस काढणी झाल्यानंतर हे पीक घरात आणावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वावडे ते लोण हा दोन किलोमीटरचा जुना पाणंद रस्ता आहे. शेताचे पाणी या रस्त्यात येत असल्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. मागील कित्येक वर्षापासून शिवारातील जाणे- येणे करण्यासाठी तसेच शेतमाल घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

कापसाचा हंगाम १५ ते २० दिवसांवर येऊन ठेपला आहे. संपूर्ण पाणंद रस्ता चिखलमय झाला. शेतात तयार झालेला माल घरी कसा आणावा, असा प्रश्न या परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे. या वर्षी तरी रस्ता होईल, अशी आशा शेतकरी दरवर्षी करतात. पावसाळा निघून गेल्यावर या रस्त्याचा विसर पडतो. या वर्षी मात्र, झालेल्या अति पावसामुळे व रस्त्यात पाणी साचून राहत आहे. त्यामुळे रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. हा पांदण रस्ता करून देऊन  शेतकऱ्यांची कायम समस्या सोडवावी, अशी मागणी वावडेसह शेतकऱ्यांनी केली. 

योजनेलाच कात्री 

जिल्हास्तरावर रोजगार हमी योजनेंतर्गत पांदण रस्ते तयार करता येतात. जिल्ह्यात मात्र गेल्या पाच वर्षांपासून या योजनेलाच कात्री लावण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे 

खासदार, आमदारांना मतदारसंघाच्या विकासकामासाठी स्थानिक विकास निधी देण्यात येतो. मात्र, या निधीचा वापर सभागृह बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. पांदण रस्ता आधी झाला असेल, तरच स्थानिक विकास निधी खडीकरण्यासाठी वापरता येतो. हा प्राधान्यक्रम बदलण्याची गरज आहे. स्थानिक विकास निधीतून पाणंद रस्ते करण्यासाठी तरतूद होण्याची गरज आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com