MPKV Rahuri Agrowon
ॲग्रो विशेष

MPKV Rahuri : राहुरीतील कृषी विद्यापीठात उद्या ३७ वा पदवीदान समारंभ

MPKV Convocation Ceremony : महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या (ता. २९) ३७ वा पदवीप्रदान समारंभ होणार आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या (ता. २९) ३७ वा पदवीप्रदान समारंभ होणार आहे. अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस असतील. या वेळी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. आर. एस. परोदा, कृषिमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित असतील.

‘‘या समारंभावेळी विखे पाटील, महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले व नाशिक येथील ‘सह्याद्री फार्म्स’चे अध्यक्ष विलास शिंदे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.

सहा हजार ८९५ विद्यार्थ्यांना मिळणार पदवी

‘‘या पदवीदान समारंभात गेल्या वर्षातील विविध विद्याशाखांतील एकूण ६ हजार ८९५ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, पीएचडी पदवीने कुलपती रमेश बैस यांच्या हस्ते अनुग्रहित करण्यात येणार आहे.

त्यात विविध विद्याशाखांतील ६ हजार ५२२ विद्यार्थ्यांना पदवी, ३०० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी तर ७३ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवीने अनुग्रहित केले जाईल. या वेळी यशस्वी स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदके आणि रोख पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात येईल,’’ असे कुलगुरू डॉ. पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Census : नाशिकमध्ये मोबाईल अॅपद्वारे पशुधन गणना सुरू

NCP ajit pawar Candidate : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही तिसरी यादी आली समोर! तिसऱ्या यादीत फक्त चौघांचा समावेश

E-Peek Pahanai : अकोला जिल्ह्यात ८२ टक्के शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी

Paddy Market : धानाला किमान चार हजार रुपये क्‍विंटलचा दर द्या

Rabi Season 2024 : मराठवाड्यात रब्बी पेरणीची गती मंद

SCROLL FOR NEXT