MPKV Rahuri : राहुरी विद्यापीठ आणि सातारा जिल्हा बॅंकेत सामंजस्य करार

Memorandum of Understanding : ऊस पिकाचे शाश्वत उत्पादन वाढीसाठी प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील सहा हजार तरुण शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादन वाढ करण्याची चळवळ राबविण्यात येणार आहे. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व जिल्हा बँकेत या संदर्भात सामंजस्य करार झाला.
Memorandum of Understanding
Memorandum of UnderstandingAgrowon
Published on
Updated on

Satara News : जिल्हा बॅंकेचे मार्गदर्शक संचालक आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या संकल्पनेतून बॅंकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ऊस पिकाचे शाश्वत उत्पादन वाढीसाठी प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील सहा हजार तरुण शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादन वाढ करण्याची चळवळ राबविण्यात येणार आहे. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व जिल्हा बँकेत या संदर्भात सामंजस्य करार झाला.

या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी ऊस उत्पादन वाढ या पद्धतीचा देशातील पहिलाच उपक्रम जिल्हा बँकेच्या माध्यमातून राबवीत असल्याबद्दल आनंद वाटतो, असे नमूद केले. या वेळी विद्यापीठाचे नोडल अधिकारी डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी मार्गदर्शन केले.

Memorandum of Understanding
MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ‘क्रॉम्पटन ग्रीव्हज’बरोबर करार

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी शाश्वत ऊस उत्पादनवाढीसाठी ऊस उत्पादक शेतकरी, कृषी विद्यापीठ राहुरी व जिल्ह्यातील साखर कारखाने यांची एकत्रित मोट बांधून नावीन्यपूर्ण उपक्रमाची रूपरेषा ठरविली.

Memorandum of Understanding
Sugarcane Rate : राजू शेट्टींचे काटा बंद आंदोलन यशस्वी, दालमिया शुगर्सकडून दर देण्याचे मान्य

आमदार बाळासाहेब पाटील यांनी साखर कारखान्यांची संख्या व गाळप क्षमता वाढत असून, त्याप्रमाणात ऊस पिकाखालील क्षेत्राच्या वाढीस मर्यादा असल्याने उसाचे एकरी उत्पादन वाढविणे हा एकमेव पर्याय असल्याचे नमूद केले.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून माती परीक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याची सहमती दर्शविली.

आमदार मकरंद पाटील व प्रभाकर घार्गे यांनी सूचना मांडल्या. बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जास्तीतजास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. या वेळी बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, शिवरुपराजे निंबाळकर, प्रदीप विधाते, रामभाऊ लेंभे, ज्ञानदेव रांजणे,

शेखर गोरे, सुरेश सावंत, लहुराज जाधव, कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, डॉ. एस. डी. मासालकर, बँकेचे अधिकारी, तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक उपस्थित होते. बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com