Cotton Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seeds : बाजारात कपाशीचे ‘ते’ बियाणे मिळेना

Online Seed Purchase : या हंगामात एका कंपनीच्या कपाशीचे दोन वाणांचे बियाणे अकोला जिल्हयात संपुष्टात आलेले आहे. हेच बियाणे जिल्ह्यातील शेतकरी ऑनलाइन पद्धतीने खरेदी करीत आहेत.

Team Agrowon

Akola News : या हंगामात एका कंपनीच्या कपाशीचे दोन वाणांचे बियाणे अकोला जिल्हयात संपुष्टात आलेले आहे. हेच बियाणे जिल्ह्यातील शेतकरी ऑनलाइन पद्धतीने खरेदी करीत आहेत. मात्र, हे बियाणे हवे असेल तर इतर दुसरे साहित्य त्यांच्या मस्तकी मारल्या जात आहे. याबाबत तक्रारी नसल्याने कृषी विभागही हतबल झाल्याचे दिसून आलेला आहे.

अकोला जिल्ह्यात गेल्या काळात कपाशीच्या दोन वाणांसाठी रांगा लागल्याचा प्रकार राज्यभर गाजला होता. यंदा जिल्हयात कंपनीने पुरवलेले बियाणे हातोहात संपुष्टात आले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हे बियाणे उपलब्ध नसल्याचेही जाहीर केले होते. मात्र, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी मागणी असूनही बियाणे नसल्याने शेतकरी इतर ठिकाणी या वाणांचा शोध घेत होते. अशातच ऑनलाइन मार्केटिंग करीत असलेल्या एका पुरवठादारामार्फत हे बियाणे दिले जात आहे.

शेतकऱ्यांना हव्या तितक्या बॅग मिळत आहे. मूळ किमतीनेच विक्री केली जात आहे. परंतु, बियाण्याच्या काही पाकिटांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पाकिट घेण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. त्याशिवाय बियाणे दिले जात नाही. शेतकरी गरज असल्याने निमूटपणे हा प्रकार सहन करीत आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील विक्रेतेसुद्धा या ऑनलाइन कापूस बियाणे विक्रीवरून नाराज आहेत. त्या कपाशी वाणाचे बियाणे विक्री करू नये असे प्रशासन आम्हाला कळवते. दुसरीकडे हजारो पाकिटांची ऑनलाइन विक्री जोरात सुरु आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या ऑनलाइन विक्री फंड्याने विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

तक्रार आल्यास कारवाई

ऑनलाइन पद्धतीने कपाशीच्या पाकिटांसोबत लिंकिंग होत असल्याचे शेतकरी सांगत असले तरी प्रत्यक्ष तक्रार झालेली नाही. लेखी तक्रार केल्यास कारवाई करता येईल, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

कापूस बियाणे विक्रीचा काळाबाजार

जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यात कापसाच्या विशिष्ट वाणांची मोठी मागणी झालेली आहे. याचा गैरफायदा संबंधितांनी मोठ्या प्रमाणात उचलला. ८६४ रुपयांचे पाकिट तब्बल १४०० ते १५०० रुपयांपर्यंत विक्री केल्या गेले. आडसूळ फाटा येथील एकमेव विक्रेत्याविरूद्ध याबाबत कारवाईसुद्धा झाली. अजूनही वाढीव किमतीत ते वाण विक्रीचा फंडा सुरु आहे. काही जण परजिल्ह्यातून हे बियाणे आणून जास्त दरात विकत आहेत. करण्यास कुणी समोर येत नसल्याने बरेच प्रयत्न करूनही कृषी विभागास यश मिळत नसल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT