Cotton Seeds : कापूस बियाण्यासाठी शेतकरी जाताहेत परराज्यांत

Cotton Seeds Shortage : खानदेशात १६ मेपासून कापूस बियाणे विक्री अधिकृतपणे सुरू झाली. परंतु बियाणे पुरवठादार कंपन्यांची नफेखोरी व कृषी विभागावर हावी असलेले वितरक यांच्या मनमानीने बियाण्याची कृत्रीम टंचाई आहे.
Cotton Seeds
Cotton SeedsAgrowon

Jalgaon News : खानदेशात १६ मेपासून कापूस बियाणे विक्री अधिकृतपणे सुरू झाली. परंतु बियाणे पुरवठादार कंपन्यांची नफेखोरी व कृषी विभागावर हावी असलेले वितरक यांच्या मनमानीने बियाण्याची कृत्रीम टंचाई आहे. परिणामी, शेतकरी बियाण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेशात जात आहेत.

तेथे आपणास हव्या असलेल्या कापूस बियाण्याची खरेदी करीत आहेत. तसेच खानदेशात अद्याप देशी, सरळ किंवा देशी सुधारित कापूस वाणांचा पुरवठा अपवाद वगळता कंपन्यांनी केलेला नसल्याने या वाणांची चाचपणीदेखील शेतकरी परराज्यांत करीत आहेत. कापसाची विक्री कवडीमोल दरात किंवा बाराच्या भावात शेतकरी मागील दोन हंगाम करीत आहेत. दुसरीकडे खानदेशात कापूस बियाण्याची विक्री १२०० ते १५०० रुपयांत काळ्या बाजारात सुरू आहे.

Cotton Seeds
Cotton Seed: राज्यात कृत्रिम बियाणे टंचाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

यातच हवे तेवढे बियाणे किंवा वाण काळ्याबाजारात मिळत नसल्याने मोठे शेतकरी किंवा शेतकरी गट थेट मध्य प्रदेशात बियाण्यासाठी पोहोचत आहेत. जळगाव जिल्ह्यातील विशेषतः मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा, अमळनेर या भागांतील शेतकरी मध्य प्रदेशातील बडवानी, खरगोन, बऱ्हाणपूर, अलीराजपूर आदी भागांत किंवा नर्मदाकाठावरील क्षेत्रात बियाण्यासाठी जात आहेत. मध्य प्रदेशात देशी वाणही उपलब्ध झाले आहेत.

Cotton Seeds
Cotton Seeds Shortage: राज्यात कापूस बियाण्याची टंचाई

यामुळे तेथे या वाणांसाठीदेखील शेतकरी गट तयार करून बियाणे खरेदीसाठी जाऊ लागले आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, नंदुरबारातील नवापूर, तळोदा, शहादा, नंदुरबार भागांतील शेतकरी मध्य प्रदेशातील बडवानी, खरगोन, इंदूर व लगत आणि गुजरातमधील तापी, बडोदा, नर्मदा जिल्ह्यांत कापूस बियाण्यासाठी जात आहेत. तेथे ओळखीपाळखीची मंडळी, नातेवाईक आदींच्या मदतीने बियाण्याची खरेदी करून शेतकरी येऊ लागले आहेत.

तेथेही काही शेतकरी काळ्याबाजारातून देशी कापूस वाणांची खरेदी करीत आहेत. परंतु खानदेशात बियाण्याची कृत्रीम टंचाई व चढे दर असल्याने शिवाय पूर्वहंगामी कापूस लागवडीची वेळ हातून जात असल्याने शेतकरी गुजरात, मध्य प्रदेशातून कापूस बियाणे खरेदी करीत आहेत. चोपडा, शिरपूर, शहादा भागांतील काही शेतकरी अनेक वर्षे गुजरातमधून बियाणे आणत आहेत. त्यांच्या मदतीने अन्य शेतकरी खात्रीशीर बियाणे गुजरातमधून आणून त्याची लागवड करीत आहेत.

या बियाण्याची होतेय विक्री..

गुजरातेत तणनाशक सहनशील (एचटीबीटी), बोलगार्ड ४ किंवा फोरजी आदी नावांनी कापूस बियाण्याची विक्री होत आहे. त्याचीही खरेदी नंदुरबार, धुळे जिल्ह्यांत होत असल्याची माहिती मिळाली. खानदेशातील २० ते २५ टक्के क्षेत्रात गुजरात, मध्य प्रदेशातील बियाण्याची लागवड होईल, असे चित्र दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com