Cotton Seed : पावणे दहा लाख कपाशी बियाणे पाकिटांची उपलब्धता

Cotton Seed Packets : बीड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी दहा लाख ५० हजार आवश्यक संकरित कापूस बीटी बियाणे पाकिटाची गरज आहे. विविध कंपन्यांनी जवळपास १३ लाख २८ हजार कपाशी बियाणे पाकीट पुरवठ्याचे नियोजन केले आहे.
Cotton Seed
Cotton SeedAgrowon

Beed News : बीड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी दहा लाख ५० हजार आवश्यक संकरित कापूस बीटी बियाणे पाकिटाची गरज आहे. विविध कंपन्यांनी जवळपास १३ लाख २८ हजार कपाशी बियाणे पाकीट पुरवठ्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी जवळपास पावणेदहा लाख कपाशी बियाणे पाकिटे जिल्ह्यात पुरविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेची कृषी विकास अधिकारी सायप्पा गरांडे यांनी दिली. विशिष्ट वाणाचा आग्रह शेतकऱ्यांनी धरू नये असे आवाहनही त्यांनी केले.

श्री. गरांडे म्हणाले, की जिल्ह्यात सर्व पिकांच्या बियाणांची मुबलक उपलब्धता आहे. कपाशी बियाण्यांची मागणी करताना शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणाची मागणी करू नये. शिवाय कुणी चढ्या दराने बियाण्याची विक्री करीत असल्यास त्याची माहिती कृषी विभागाला द्यावी. यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ८ लाख १ हजार २०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामध्ये सोयाबीन ३ लाख ७३ हजार हेक्टर, कपाशी २ लाख ७७ हजार हेक्टर,

Cotton Seed
Cotton seed Varieties : लागवड पद्धतीनुसार कपाशी वाणाची निवड

भुईमूग १२०० हेक्टर, तीळ २०० हेक्टर ,उडीद ३७ हजार ४०० हेक्टर ,मूग ९९०० हेक्टर, तुर ५२ हजार ७०० हेक्टर, मका ७३०० हेक्टर ,बाजरी ३९ हजार २०० हेक्टर, तर ज्वारी २ हजार १०० हेक्टरवर प्रस्तावित करण्यात आली आहे. सोयाबीनचे ९८ हजार ८७० क्विंटल बियाणे लागणार असून त्यापैकी जवळपास ८० हजार ४०२ क्विंटल बियाणे २२ मे अखेरपर्यंत जिल्ह्यात पुरवठा करण्यात आले होते. कपाशीचे प्रस्तावित क्षेत्र बघता जवळपास ४९९७ क्विंटल म्हणजे १० लाख ५० हजार बियाणे पाकिटाची गरज जिल्ह्याला होती.

त्यापैकी २२ मे पर्यंत जवळपास २७४१ क्विंटल कपाशी बियाण्यांचा म्हणजे जवळपास ५ लाख ७७ हजार कपाशी बियाणे पाकिटांचा पुरवठा करण्यात आला होता. तो अलीकडच्या एक-दोन दिवसापर्यंत जवळपास पावणेदहा लाख बियाणे पाकीट पुरवठ्यापर्यंत पोहोचविण्यात आला आहे. पोहोचविण्यात आलेल्या बियाणे पाकिटांपैकी जवळपास ७० हजार बियाणे पाकीट विकल्या गेली आहेत .तर २२ हजार क्विंटल सोयाबीनची बियाणे ही विकल्या गेले आहे.

Cotton Seed
Cotton Seed: राज्यात कृत्रिम बियाणे टंचाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

सर्वच पिकांच्या बियाण्याचा विक्री पाहता उपलब्ध बियाण्यांपैकी जवळपास २० टक्के बियाणे विकल्या गेले आहे. शेतकऱ्यांच्या नजरा पावसाच्या आगमनाकडे असून पहिला पाऊस पडल्यानंतर बियाणे विक्रीत गतीने वाढ होण्याची आशा, असल्याचे श्री गरांडे म्हणाले. यंदा पाऊस चांगला व वेळेत येण्याचा अंदाज आहे अर्थात पावसाला विलंब झाला तर मूग उडदाचे अपेक्षित क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे सारं काही पावसाच्या भरोशावर अवलंबून असेल, असेही श्री गरांडे म्हणाले.

१ लाख ३४ हजार ९२१ टन खत उपलब्ध

जिल्ह्यासाठी एक लाख ८७ हजार १०० टन युरिया डीएपी, एमओपी, एनपीके, एसएसपी खताचे आवंटन मंजूर करण्यात आले होते. २१ मे अखेर जवळपास १ लाख २८ हजार २१४ टन खतांची उपलब्धता होती. त्यात आणखी ६ हजार ७०८ टन खतपुरवठा करण्यात आल्याने एकूण खताची उपलब्धता १ लाख ३४ हजार ९२१ टन झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com