Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, तेरेखोलने इशारा पातळी ओलांडली

Rain News : काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पडत होत्या.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२३) मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. तेरेखोलने नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असून वाहतूक विस्कळित झाली आहे.

जिल्ह् यात कालपासून पावसाचा जोर वाढण्यास सुरवात झाली. काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पडत होत्या. सायकांळी उशिरा पावसाचा जोर वाढण्यास सुरवात झाली. रात्रभर जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, देवगड, वेंगुर्ला, मालवण या तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले.

पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. कुडाळ माणगाव खोऱ्यातील अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे येथील काही रस्ते पाण्याखाली गेले. दुकानवाड (ता. कुडाळ) येथील पुलावर पुराचे पाणी वाहत असल्याने अनेक वाहने अडकून पडली आहे.

जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली असून तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडल्याने बांदा बाजारपेठेला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसामुळे जिल्हयात काही ठिकाणी पडझडीचे प्रकार झाले आहे. किंजवडे (ता. देवगड) येथे घर कोसळून मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान शनिवारी (ता. २४) सकाळपासून देखील जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय पावसाची नोंद

देवगड - ११८.४ मि. मी, मालवण - १३०.४ मि. मी, सावंतवाडी - ११४.४ मि. मी, वेंगुर्ला - ११२.७ मि. मी, कणकवली - ७१.१ मि. मी, कुडाळ - १५६.१ मि. मी, वैभववाडी - ६४.५ मि. मी, दोडामार्ग - ७५.५.मि.मी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Industry Growth: साखर उद्योगाला चालना मिळणार

Banana Price: केळीचे दर पोहोचले नीचांकी पातळीवर

Kolhapur Jaggery Market: कोल्हापूर गूळ बाजारात तीन तासांसाठी सौदे ठप्प

Agri College Case: विद्यार्थी मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करा

Public Service Helpline: खेड तालुक्यात नागरिकांसाठी ‘आमदार हेल्पलाइन’ उपक्रम

SCROLL FOR NEXT