Nashik News : कळवण तालुक्यात शेतकऱ्यांकडून टोमॅटोचे उत्पादन घेण्याकडे कल वाढला असून तालुक्यात सुमारे तीनशे ते ३५० हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. एकेकाळी ऊस पट्ट्यातील हा परिसर आता टोमॅटो लागवडीत अग्रेसर झाला आहे. त्यामुळे कळवण खुर्द परिसराची ओळख टोमॅटोचे आगार अशी बनत आहे.
गतवर्षी उन्हाळी हंगामाच्या अखेरीस टोमॅटोच्या दराने उसळी घेतल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढ साधता आली. इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात दर चांगला मिळतो म्हणून कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगामात टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. टोमॅटो लागवड म्हणजे एक प्रकारची लॉटरीच आहे.
लागली तर लागली नाहीतर संपूर्ण जागेवर पीक सोडून द्यावे लागते. मात्र अशी परिस्थिती असताना देखील तालुक्यातील शेतकऱ्यांना टोमॅटो लागवडी वाढत्या आहेत. कळवण खुर्द, कळवण बुद्रूक, पाळे, नाकोडे, देसराणे, बेज, शिरसमणी, मानूर, एकलहरे आदी गावाबरोबरच परिसरात शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात.
उत्पादन खर्चात वाढ, दरातील चढ-उतार, गारपीट, अवकाळी, तापमान वाढ, किडीचा प्रादुर्भाव, फूल गळती व वेगवेगळे रोग यासह अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मात्र असे असताना देखील तालुक्यात टोमॅटो लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करून टोमॅटोच्या उत्पादनात वाढ केली आहे.
कळवण तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकाची लागवड करून आधुनिक तंत्रज्ञान व विविध उपाययोजना करून दर्जेदार व गुणवत्ता माल तयार करून टोमॅटो मार्केटमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. तालुक्यात यंदा ३०० ते ३५० हेक्टर लागवड झाली असून शेतकरी वर्गाला चांगल्या भावाची अपेक्षा आहे.मिनल म्हस्के-पगार, तालुका कृषी अधिकारी, कळवण
टोमॅटो दरावरच सर्व काही अवलंबून
गतवर्षी उन्हाळी हंगामात सुरुवातीला टोमॅटोच्या नीचांकी दरामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. काहींनी लागवडी लवकर काढून टाकल्या. परंतु शेवटी शेवटी टोमॅटो दराने उच्चांक गाठला. त्याचदरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या तोडे व लागवडी उभ्या होत्या. त्यांना फोन पैसे चांगले पदरात पडले.याही हंगामात अनेकांनी टोमॅटोची लागवड केली आहे. मात्र यावर्षी टोमॅटोला कसा दर मिळेल यावरच सर्वकाही अवलंबून आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.