Tomato Food Processing : टोमॅटोपासून पावडर निर्मिती

Tomato Food : चमकदार रंग आणि वैशिष्ट्यपूर्ण चव असलेले परिपक्व टोमॅटो निवडावेत. फळांची विविधता आणि परिपक्वता पावडरची चव आणि दर्जावर परिणाम करते. टोमॅटोमधील लाइकोपीन आणि जीवनसत्त्व ‘अ’मुळे त्वचा आणि केस चांगले राहतात.
Tomato
TomatoAgrowon

कृष्णा काळे, डॉ. अनुप्रीता जोशी

भारतात टोमॅटो काढणीनंतर हाताळणीच्या अभावामुळे सुमारे २५ टक्के उत्पादनाचे नुकसान होते. हे लक्षात घेऊन टोमॅटोचे स्वादिष्ट उत्पादनांमध्ये रूपांतर करता येते. टोमॅटोमधील लाइकोपीन आणि जीवनसत्त्व ‘अ’मुळे त्वचा आणि केस चांगले राहातात. टोमॅटोमधील घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवितात. लाइकोपीन हाडांच्या आरोग्यासाठी चांगले आहे.

टोमॅटो पावडर निर्मितीची प्रक्रिया :

चमकदार रंग आणि वैशिष्ट्यपूर्ण चव असलेले परिपक्व टोमॅटो निवडावेत. फळांची विविधता आणि परिपक्वता त्याच्या पावडरच्या चव आणि दर्जावर प्रभाव टाकते. फळे पक्व झाल्यावर हिरवी ते पिवळी-लाल झाली की तोडली जातात. सर्व टोमॅटो खूप लवकर मऊ होतात, ज्यामुळे त्यांना जखम होण्याची आणि नंतर सडण्याची शक्यता असते. त्यामुळे पिकलेली फळे झाडावरून हलक्या हाताने तोडावीत. फळांची काढणी सकाळच्या वेळेत करावी.

Tomato
Black Tomato Farming : लाखोंचा नफा मिळवून देणाऱ्या काळ्या टोमॅटोच्या शेतीचा इतिहास

वर्गीकरण हे आकार, रंग आणि वजनानुसार केले जाते. खराब झालेले फळ काढून टाकावे. स्वच्छ आणि चमकदार टोमॅटोला प्राधान्य द्यावे. सुपर ए, सुपर, फॅन्सी आणि कमर्शिअल या प्रकारे वर्गवारी केली जाते.

निवडलेली फळे स्वच्छ पाण्याने धुवावीत. त्यानंतर वाळवण्याची वेळ कमी करण्यासाठी आणि अंतिम उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी टोमॅटो सुकण्यापूर्वी कापावेत. यासाठी छोटी यंत्रे उपलब्ध आहेत. यंत्रामध्ये ट्रान्समिशन सिस्टम आणि दोन स्टेनलेस स्टील वर्तुळाकार ब्लेड असतात.यंत्राने प्रति तास १२० किलो टोमॅटो कापता येतात. भाजीपाला स्लायसर यंत्राने तुकडे करता येतात.

Tomato
Black Tomato : लाल टोमॅटोंच्या दुनयेत काळ्या टोमॅटोंची एन्ट्री

कापलेले टोमॅटो पूर्णपणे सुके होईपर्यंत उन्हात ठेवतात. टोमॅटो कापामध्ये सहा टक्यांपर्यंत ओलावा ठेवावा. जास्त ओलावा होईपर्यंत वाळवले जातात. टोमॅटो काप थेट सूर्यप्रकाशात ठेवू नयेत, कारण यामुळे रंग फिकट होईल. मेकॅनिकल ड्रायर वापरल्याने चांगला रंग आणि उच्च दर्जाचे उत्पादन मिळेल. टोमॅटो सुकविण्यासाठी योग्य असलेले यांत्रिक ड्रायर उपलब्ध आहेत. यामध्ये ट्रे ड्रायर, क्रॉस फ्लो एअर ड्रायर, सोलर ड्रायर्स, कॅबिनेट ड्रायर्स आणि ऑस्मोटिक ड्रॉइंग पद्धतींचा समावेश आहे.

चव आणि रंगाच्या दृष्टीने चांगल्या उत्पादनाच्या गुणवत्तेसह पावडरीचे लहान कण मिळवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. या प्रक्रियेसाठी हॅमर मिल, एट्रिशन मिल, पीन मिल आणि प्लेट मिल ग्राइंडर वापरले जातात. टोमॅटो पावडर फॉर्म फिल सीलर वापरून प्लॅस्टिक किंवा फॉइल बॅगमध्ये पॅक करता येते. तसेच टीन आणि काचेच्या कंटेनरमध्ये देखील पॅकिंग करता येते.

पावडरीमधील घटक (प्रति १०० ग्रॅम)

पाणी : ३.०६ ग्रॅम

ऊर्जा : ३०२ किलो कॅलरी

प्रथिने : १२.९ ग्रॅम

चरबी : ०.४४ ग्रॅम

कार्बोहायड्रेट : ७४.७ ग्रॅम

तंतुमय घटक : १६.५ ग्रॅम

एकूण साखर : ४३.९ ग्रॅम

कॅल्शिअम : १६६ मिग्रॅ.

लोह : ४.५६ मिग्रॅ.

मॅग्नेशिअम : १७८ मिग्र.

फॉस्फरस : २९५ मिग्रॅ.

पोटॅशिअम : १९३० मिग्रॅ.

संपर्क : कृष्णा काळे, ८८०५९६८५३६

(कृष्णा काळे अन्नप्रक्रिया तज्ज्ञ आहेत, डॉ.अनुप्रीता जोशी वसंतराव

नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात सहायक प्राध्यापक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com