Orchard  Agrowon
ॲग्रो विशेष

Orchard Cultivation : फळझाडांच्या लागवडीमुळे उत्पन्नात दहा टक्के वाढ

बाळासाहेब पाटील

Mumbai News : बीड आणि परळीसारख्या दुष्काळग्रस्त भागांसह मध्य प्रदेशमध्ये साडेचार कोटी फळझाडे लावून २२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न दहापट वाढले आहे, असा निष्कर्ष मयंक गांधी यांच्या नेतृत्वाखालील ग्लोबल विकास ट्रस्टने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसद्वारे केलेल्या अहवालात काढण्यात आला आहे.

प्रभादेवी येथील मोतीलाल ओसवाल टॉवरमध्ये झालेल्या कार्यक्रमात या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. जलसिंचन शाश्‍वत शेती आणि विपणन व्यवस्थेमध्ये मूलभूत काम केल्याने शेतकऱ्यांच्या प्रतिएकर वार्षिक उत्पन्नात ३८ हजार ६०० वरून तीन लाख ९० हजारांवर उत्पन्न गेल्याचेही अहवालात नमूद केले आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील ४ हजार गावांतील २२ हजार शेतकऱ्यांचा सर्व्हे केला.

२०११ मध्ये अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत गांधी यांनी भारत भ्रष्टाचार विरोधी चळवळ सुरू केली होती. नंतर ते ‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा भाग बनले. पण २०१६ मध्ये त्यांनी राजकारण पूर्णपणे सोडले आणि शेतकरी कल्याणासाठी भारतातील दुष्काळग्रस्त क्षेत्रात काम करण्यासाठी ग्लोबल विकास ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. ते ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत.

श्री. गांधी म्हणाले, ‘‘देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण आणि आरोग्यसेवा आदी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परंतु देशात परिवर्तन घडविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शाश्वत शेती आहे. लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ केल्यास भारत पुन्हा सोन्याचे दिवस पाहू शकतो. जलसिंचन आणि शाश्वत विपणन सुधारल्यामुळे आम्ही दुष्काळग्रस्त भागांमध्ये चांगले काम करू शकलो.’’

चांगल्या दर्जाच्या रोपांमुळे उत्पन्न वाढ

हा अहवाल सेंटर ऑफ एक्सलन्स इन ‘सीएसआर’ने तयार केला आहे. पालघर, नांदेड, बीड, सोलापूर, धाराशिव, जळगाव आणि मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर, धार, बरवानी यासह विविध जिल्ह्यांमध्ये १२४८ शेतकरी आणि भागधारकांचा समावेश असलेले सर्वेक्षण करून जीव्हीटीच्या कृषी विकास उपक्रमांच्या परिणामांचे विश्लेषण केले. उच्च दर्जाच्या रोपांची उपलब्धता आणि वापर केल्याने उत्पादनात वाढ झाली असल्याचे यामध्ये दिसून आले.

कीटक आणि हवामान बदलामुळे उद्‍भवलेल्या आव्हानांविरूद्ध लढण्यासाठी दर्जेदार रोपट्यांचा अवलंब केल्याने परिणाम साधता आला. बदलत्या पीक पद्धतीचे मॉडेल महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील चार हजारांहून अधिक गावांमधील २२ हजार हून अधिक शेतकरी कुटुंबांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यात यशस्वी ठरले आहे. हा बदल साडेचार कोटींपेक्षा जास्त फळझाडांची लागवड करून, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन साधला गेला आहे.

कृषिकुलची स्थापना

‘जीव्हीटी’च्या वतीने नवीन कृषिकुलाची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती गांधी यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘एका नवीन, अत्याधुनिक जागतिक कृषिकुल शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम सुरू आहे. त्याचा उपयोग देशभरातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात ४ ते १० पटीने वाढ करण्याकरिता प्रशिक्षण देण्यासाठी केला जाईल. काम करताना शेतकऱ्यांना विविध कृषितंत्रांचे प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित केले. अगदी दारूबंदी चळवळीवरही लक्ष केंद्रित केले. शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यावर आणि जलसाठा वाढविण्यावर भर दिला.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT