Horticulture Export Training Course : निर्यात व्यवसायात करियर करणाऱ्यांसाठी पणन मंडळाचे प्रशिक्षण

Horticulture Export Training Course :  निर्यात व्यवसायात करियर करणाऱ्यांसाठी पणन मंडळाचे प्रशिक्षण
Published on
Updated on

Pune News : राज्यातील विविध भागात बागायत शेती केली जाते. पण फक्त याचे योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळत नसल्याने बागायतदार शेतकरी मागे पडत आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. याचतंर्गत महामंडळाकडून निर्यात व्यवसायात करियर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे. हे प्रशिक्षण दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिले जाणार असून या प्रशिक्षणात फलोत्पादन निर्यात कशी करावी, याची माहिती दिली जाणार आहे.

राज्यात सध्या फलोत्पादन वाढ होत आहे. पण साठवणूक आणि योग्य प्रशिक्षणाच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यावर उपाययोजना आखल्या जात आहेत. तर महाराष्ट्र पणन मंडळाकडून कृषिमाल निर्यातीसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत. या प्रशिक्षणाचे ठिकाण पुणे हे असून ते महाराष्ट्र राज्य कृषी प्रधानमंडळ येथे असेल.

Horticulture Export Training Course :  निर्यात व्यवसायात करियर करणाऱ्यांसाठी पणन मंडळाचे प्रशिक्षण
Cotton Procurement : ‘पणन’ने निश्‍चित केलेली ३० कापूस खरेदी केंद्रे ‘सीसीआय’ करणार सुरू

प्रशिक्षणाचा उद्देश

तसेच कृषिमालाची निर्यातवृद्धी करणे, शेतकऱ्याच्या शेतमालाचे मुल्यवर्धन जपणे, परकीय चलन प्राप्त करणे या उद्देशांसह नवे निर्यातदार तयार करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

कोणतीही अट नाही

तर कृषिमालाचे निर्यातदार होण्यास इच्छुक व्यक्तीना या प्रशिक्षण कार्यक्रमात संधी देण्यात येणार असून यासाठी कोणतीही वयोमर्यादेची अट किंवा किमान पात्रतेची आवश्यक नाही.

शशुल्क प्रशिक्षण

हे प्रशिक्षण पाच दिवसांचे असून यासाठी इच्छुकांना शुल्क भरावे लागणार आहे. निवासी प्रशिक्षणासाठी शुल्क ११,५०० रुपये, अनिवासी प्रशिक्षणासाठी शुल्क ९६३५ आणि महिलांसाठी हे शुल्क ८६३८ असणार आहे.

Horticulture Export Training Course :  निर्यात व्यवसायात करियर करणाऱ्यांसाठी पणन मंडळाचे प्रशिक्षण
Agriculture Production : देशात फलोत्पादन, अन्नधान्यात विक्रमी वाढ

काय मिळणार शुल्कात?

पाच दिवसांच्या या प्रशिक्षणात मोजण्यात येणाऱ्या शुल्कात प्रशिक्षण साहित्य, निवासी असेल तर निवास, जेवण, नाश्ता, चहा दिला जाणार आहे.

शेवटचा आठवडा राखीव

या योजनेत प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांसाठी दर महिन्याचा शेवटचा आठवडा राखीव ठेवण्यात आला आहे. तर त्या आठवड्यातील पाच दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे.

काय असेल प्रशिक्षणात?

या प्रशिक्षणात पणन मंडळाचे कार्य, ताजी फळे व भाजीपाला निर्यात संधी इनकॉईस, पॅकिंग लिस्ट, शिपिंग बिले यांची ओळख करून दिली जाईल. तसेच निर्यातीचे नियम आणि मानके, वाहतूक व पुरवठा यंत्रना, निर्यातीसाठी शासनाच्या योजना, फळे व भाजीपाल्यावर विशेष प्रक्रिया पद्धतींचा अभ्यास असेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com