Tembhu Agrowon
ॲग्रो विशेष

Tembhu Irrigation Scheme: टेंभूचे आवर्तन मेअखेर सुरू राहणार

Water Supply in Maharashtra: सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणाऱ्या टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन अखंड सुरू आहे. दुष्काळी गावांना दिलासा मिळत असून हे आवर्तन मे अखेरपर्यंत सुरू राहणार आहे.

Team Agrowon

Sangli News: रब्बी व उन्हाळी हंगामासाठी गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून टेंभू सिंचन योजनेचे अखंडितपणे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे सांगली,सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील टेंभूच्या लाभक्षेत्रातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे सदर आवर्तन मे अखेरपर्यंत चालणार आहे, अशी माहिती टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दुष्काळी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई व पिके पाण्याअभावी कोमेजून जाऊ लागल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गातून टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी झाली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रब्बी व उन्हाळी हंगामासाठी टेंभूचे आवर्तन सुरू केले. तब्बल सव्वा दोन महिन्यांपासून हे आवर्तन अखंडपणे सुरू आहे. यावर्षी सर्वत्र टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व सिंचन योजना सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

टेंभूच्या पाण्याने कऱ्हाड तालुक्यातील ६०० हेक्टर, कडेगावातील ९ हजार ९ हजार ३२५ हेक्टर, खानापुरातील १८ हजार ९७५ हेक्टर,तासगावातील ७ हजार ७०० हेक्टर,तर आटपाडी, कवठेमहांकाळ व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला असे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील एकूण ८० हजार ४७२ लाभक्षेत्रातीपैंकी ७० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. त्यामुळे येथे टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. शेतीसह येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकालात निघाला आहे. टेंभूच्या पाण्याने दुष्काळी भागाला तारले आहे. शेती पिकांना वेळेत व मुबलक पाणी मिळाल्याने येथील पिकानाही दिलासा मिळाला असून पिके हिरवीगार आहेत.

दुष्काळी २२१ गावांचा पाण्याचा प्रश्न निकाली

टेंभू योजनेच्या उन्हाळी आर्वतनामुळे सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील ७ तालुक्यांच्या लाभक्षेत्रातील दुष्काळी टापूतील सुमारे २१७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे.

पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे

टेंभू आवर्तनाच्या माध्यमातून दिले जाणारे पाणी लोकांनी जपून व काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. पाण्याचा कोठेही अपव्यय होता कामा नये याची सर्वांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे असे आवाहन टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Genetic Editing Varieties : आयसीएआरने केले २४ पिकांमध्ये जनुकीय संपादन; भाताच्या दोन सुधारित वाण विकसित, लोकसभेत सरकारने दिली माहिती

Agriculture Budget: शेतीसाठी आर्थिक तरतूद वाढवा, संशोधन पदे तातडीने भरा, संसदीय समितीची सरकारला शिफारस

Local Body Elections: ग्रा.पं.वर प्रशासकाचे सावट!

Citrus Symposium 2025: जैन हिल्स येथे रविवारपासून  लिंबूवर्गीय शेतीविषयी मंथन

Water Scarcity: नांदी गावात हिवाळ्यातच पाणीटंचाई

SCROLL FOR NEXT