Gram Panchayat: फुलंब्री तालुक्यातील एकूण ७१ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ५३ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपत आहे. मात्र, या ग्रामपंचायतींसाठी आवश्यक असलेली निवडणूक प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसल्याने प्रशासक नेमले जाण्याची शक्यता आहे.