Telya Disease Pomegranate agrowon
ॲग्रो विशेष

Telya Disease Pomegranate : शेतकऱ्यांसमोर नवं संकट, डाळिंब बागेत ‘तेल्या’चा धुमाकूळ, सांगलीचे शेतकरी हैराण

Telya Disease : हंगाम धरलेले चार हजार हेक्टर क्षेत्र असून त्यातील जवळपास ४० टक्क्यांवर तेल्याने बाधित झाले आहे.

sandeep Shirguppe

Telya Disease Pomegranate Sangli : हंगामपूर्व एप्रिल महिन्यात हंगाम धरलेल्या डाळिंब बागेत तेल्या रोगाने धुमाकूळ घातला आहे. हंगाम धरलेले चार हजार हेक्टर क्षेत्र असून त्यातील जवळपास ४० टक्क्यांवर तेल्याने बाधित झाले आहे. उर्वरित बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालली आहे.

गतवर्षी हंगामपूर्व आगाप हंगाम धरलेल्या डाळिंब बागांना उच्चांकी भाव मिळाले होते. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी आगाप हंगाम धरण्याचे नियोजन केले होते. ऐन उन्हाळ्यात एप्रिल आणि मेच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यातील जवळपास ४००० हेक्टर डाळिंब क्षेत्राचा हंगाम धरला. उन्हाळ्यातील स्वच्छ हवामानामुळे एप्रिलमधील बागेत फळांचे चांगले सेटिंग मिळाले. त्यानंतर पाऊस सुरू झाला, जोडीला उन्हाचा चटकाही होता. त्यामुळे हवेत आर्द्रता वाढून अनेक बागांमध्ये तेल्या रोगाने शिरकाव केला.

ज्या बागेत यापूर्वी ‘तेल्या’ नव्हता, अशा बागेतही आला आहे. त्यात तालुक्याच्या पश्चिम भागातील हिवतड, गोमेवाडी, काळेवाडी, तळेवाडी, मेटकरवाडी या भागातील बागेमध्ये मोठ्या प्रमाणावर तेल्या रोग पसरला आहे.

शेतकऱ्यांनी ‘तेल्या’पासून बागा वाचवण्यासाठी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार सतत फवारणी घेतली, तरीही ‘तेल्या’ नियंत्रणात आलेला नाही. जुलैमध्ये महिनाभर रिमझिम पाऊस सुरू आहे. घाटमाथ्याखालील गावात महिनाभर रोज रिमझिम पाऊस पडतो आहे. तुलनेत पूर्व भागात प्रमाण कमी आहे. गेली दीड महिना पूर्व भागातील गावांत डाळिंबासाठी अत्यंत प्रतिकूल वातावरण बनले आहे. त्यामुळे पाहता-पाहता तेल्या रोगाने अनेक बागा ४० टक्क्यांवर फस्त केल्या आहेत.

पूर्व भागातील शेटफळे, लेंगरेवाडी, पात्रेवाडी, तडवळे, आटपाडी, आंबेवाडी, बोबेवाडी, खांजोडवाडी या गावांतही आगाप बागा ‘तेल्या’ने बाधित झाल्या आहेत. या भागामधील डाळिंब घालवण्यासाठी अद्याप अडीच महिन्याचा कालावधी आहे. हे दिवस पाऊस आणि उष्णतेचे आहेत. तब्बल अडीच महिने गेल्याने बाधित झालेल्या बागेत कमीत कमी नुकसान होण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालली आहे.

‘तेल्या’ने बाधित झालेली फळे तोडून त्याची सुरक्षित ठिकाणी विल्हेवाट लावण्याचे काम सुरू आहे. अनेक बागांतील झाडेच्या झाडे पूर्ण मोकळी झाली आहेत. ‘तेल्या’पासून बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणीही कमी केले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी खुरपणी करण्याऐवजी गवत कटिंग केले आहे. तसेच कॉपरच्या फवारण्या वाढवल्या आहेत. ‘तेल्या’ने अधिक नुकसान झालेल्या बागेतून यंदा खर्च तरी निघेल का, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अधिक नुकसानग्रस्त अनेक शेतकरी सर्व प्रयत्न करूनही रोगावर नियंत्रण मिळत नसल्याने हतबल झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT