Agrowon Podcast : टोमॅटोच्या भावात काहीशी नरमाई; कापूस, सोयाबीन, हळद तसेच काय आहेत लसणाचे दर ?

Market Update : आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, लसूण आणि हळद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

कापूस वायदे नरमले

कापसाच्या बाजारावरी दबाव सतत दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची विक्री अजूनही वाढलेली आहे. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ६९.२१ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही जुलैचे वायदे ५५ हजार ३०० रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीन बाजार दबावातच

सोयाबीन बाजारावरील दबाव कायम आहे. सोयाबीन सतत निचांकी पातळीवर ट्रेड होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारी १०.२१ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३१९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. सोयाबीनला आजही ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशात सोयापेंडचे भाव ४० हजार रुपये प्रतिटनांवर होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Agrowon Podcast : मक्यात काहीसे चढ उतार; कापूस, सोयाबीन, मका, तसेच काय आहे तूर दर ?

टोमॅटोच्या भावात नरमाई

बाजारातील टोमॅटोची आवक गेल्या काही आठवड्यांपासून कमी होत आहेत. बाजारातील काही प्रमाणात सुधारत असलेली आवक आणि वाढलेल्या दरात कमी झालेला उठाव यामुळे दरात काहीशी नरमाई आली आहे. टोमॅटोला बाजारात सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. राज्यातील अनेक भागात सध्या टोमॅटोची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. पण आवक हळूहळू वाढू शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.     

Agriculture Market
Banana Transportation : दिल्लीला केळीची रेल्वेद्वारे अल्प वाहतूक

हळदीचा बाजार नरमला

हळदीचा बाजार गेल्या काही दिवसांपासून स्थिरावला आहे. हळदीच्या भावावर वाढत्या लागवडीचा परिणाम होत आहे. त्यामुळे हळदीचा भाव उच्चांकापासून कमी होऊन स्थिरावलेला दिसतो. सध्या हळदीला सरासरी १२ हजार ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हळदीच्या भावातील नरमाई आणखी काही आठवडे राहू शकते. हळदीच्या भावात काहीसे चढ उतारही राहू शकतात, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.    

लसणाचे भाव तेजीतच

राज्यात लसणाचे भाव तेजीतच आहेत. लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. महत्वाच्या लसूण उत्पादक राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील उत्पादक भागात यंदा कमी पाऊस आणि बदलत्या वातावरणाच लसूण पिकाला फटका बसला. त्यामुळे उत्पादन कमी राहून पुरवठा घटला आहे.सध्या लसणाला गुणवत्तेप्रमाणे १४ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com