Agricultural Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Expo Sangli : ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनात तंत्रज्ञानाचा जागर

Agricultural Exhibition : ‘ॲग्रोवन विभागीय कृषी प्रदर्शन'' शुक्रवारपासून (१८ ऑक्टोबर) सांगली येथील टिळकनगरमधील अंबाबाई तालीम संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे.

Team Agrowon

Sangli News : शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अवजारे, ट्रॅक्‍टर, पिकांचे नवीन वाण, ठिबक आणि तुषार सिंचनातील नवीन तंत्रज्ञान, कीडनाशके, पशुपालन, कुक्कुटपालन, प्रक्रिया उद्योगातील नवीन तंत्र जाणून घेण्याची संधी देणारे ‘ॲग्रोवन विभागीय कृषी प्रदर्शन'' शुक्रवारपासून (१८ ऑक्टोबर) सांगली येथील टिळकनगरमधील अंबाबाई तालीम संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. सोमवारपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांची मार्गदर्शक चर्चासत्रेही आयोजित केली आहेत.

गेल्या १८ वर्षांपासून राज्यभर शेती आणि ग्रामविकासाचे विविध उपक्रम ‘सकाळ- ॲग्रोवन’तर्फे राबविण्यात येतात. त्यातीलच एक कृषी तंत्र प्रसाराचा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे कृषी प्रदर्शन. गेल्या काही वर्षांत ‘ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाने शेतकऱ्यांमध्ये मानाचे स्थान मिळविले आहे.

दर वर्षी शेती आणि पूरक उद्योगातील नवीन तंत्रज्ञान पाहण्याची खात्री असल्याने राज्यातील, तसेच परराज्यातील शेतकरीही आवर्जून या प्रदर्शनाचा लाभ घेतात. सांगलीमध्ये आयोजित प्रदर्शनाच्या माध्यमातून पीक, पूरक उद्योग, पशुपालन, प्रक्रिया तंत्र, खते, कीडनाशके, यंत्रे-अवजारांतील नवीन तंत्रज्ञानाच्या सोबत ‘ॲग्रो-संवाद’ उपक्रमात दररोज विविध विषयांतील तज्ज्ञ तसेच प्रयोगशील शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत.

‘ॲग्रो- संवाद’ चर्चासत्राचे विषय

१९ ऑक्टोबर (शनिवार)

विषय : ऊस उत्पादन वाढीची सूत्रे

वेळ : दुपारी १२ ते १.३०

वक्ते : डॉ. अशोककुमार पिसाळ, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, शेंडापार्क, कोल्हापूर

वक्ते : विकास निकम,

नागेवाडी, ता. खानापूर,

जि. सांगली (एकरी १०० टन ऊस उत्पादक शेतकरी )

२० ऑक्टोबर (रविवार)

विषय : ऑक्टोबर छाटणीनंतरचे द्राक्ष बाग व्यवस्थापन

वेळ : दुपारी १२ ते १.३०

वक्ते : डॉ. एस. डी. सावंत (माजी संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

मारुती चव्हाण (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ)

विषय : पशू व्यवस्थापन आणि स्वच्छ दूध निर्मितीचे तंत्र

दुपारी १.३० ते २.३०

वक्ते : डॉ. अनिल उलेमाले, (विभाग प्रमुख, पशू शल्यचिकित्सा शास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा आणि प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, तडसर, जि. सांगली)

प्रयोगशील पशुपालक : मकरंद पाटील, तुजारपूर, ता. वाळवा, जि.सांगली

२१ ऑक्टोबर (सोमवार)

विषय : दर्जेदार डाळिंब उत्पादनाचे तंत्र

दुपारी १२ ते १.३०

वक्ते : डॉ. राजीव मराठे, संचालक, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर

राहुल रसाळ, निर्यातक्षम डाळिंब उत्पादक, निघोज, जि. अहिल्यानगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Advisory : कृषी सल्ला : राहुरी विभाग

Assembly Election Kolhapur : कोल्हापुरातील ८ साखर कारखानदारांनी भरला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज

Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षितता

Agricultural Issues : निसर्गाच्या परीक्षेची तयारी करा नीट

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

SCROLL FOR NEXT