Agriculture Exhibition : बीडच्या कृषी प्रदर्शनासाठी शेतकरी भेटीचे जिल्ह्यांना टार्गेट

Dhananjay Munde : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदार संघात २१ ते २५ ऑगस्ट दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवले जात असून या प्रदर्शनाला शेतकरी आणण्याची जबाबदारी सर्वच जिल्ह्यांवर विभागून देण्यात आली आहे.
Agricultural Exhibition
Agricultural ExhibitionAgrowon
Published on
Updated on

Akola News : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदार संघात २१ ते २५ ऑगस्ट दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवले जात असून या प्रदर्शनाला शेतकरी आणण्याची जबाबदारी सर्वच जिल्ह्यांवर विभागून देण्यात आली आहे.

सुमारे तीन लाखांपर्यंत शेतकरी त्या ठिकाणी प्रदर्शन पाहण्यासाठी नेले जाणार असून यंत्रणा कामाला लागली आहे. कृषिमंत्र्यांच्या सूचनेनुसार भरवल्या जात असलेल्या प्रदर्शनाला बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ या ठिकाणी बुधवारी (ता. २१) सुरुवात होत आहे.

Agricultural Exhibition
Krushik Agriculture Exhibition 2024 : कृत्रिम बुद्धिमत्ता नव्हे, शेतीत मदतीला तत्पर तज्ज्ञ!

या प्रदर्शनात विद्यापीठांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञाची प्रात्यक्षिके, विविध मॉडेल्स, वाण, सिंचन, कृषी व अन्नप्रक्रिया, लागवड पद्धती, जैविक तंत्रज्ञान, पीक संरक्षण, पशुसंवर्धन आदी बाबतचे तंत्रज्ञान प्रदर्शित होणार आहे.

Agricultural Exhibition
Baramati Agriculture Exhibition : एक झाड फळ मात्र दोन! एआयची करामत

या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट, प्रक्रिया उद्योजकांच्या भेटी राहणार आहेत. यासाठी जिल्हानिहाय शेतकरी भेटीचा लक्ष्यांक देण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर विभागातून सर्वाधिक दोन लाख, लातूर विभाग ७२ हजार, कोकण विभाग १३५०, नाशिक २ हजार, अमरावती १२००, नागपूर ६५०, कोल्हापूर २,०५० आणि पुणे विभागाला १४,३५० असा एकूण दोन लाख ९४ हजार ३५० शेतकरी आणण्याचा लक्ष्यांक देण्यात आला असून, यासाठी यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com