Agricultural Exhibition : सांगलीत होणार कृषी तंत्रज्ञानाचा जागर

Agriculture Exhibition Update : शेतकऱ्यांसाठी ज्ञानाची कवाडे उघडणाऱ्या दैनिक सकाळ-ॲग्रोवनचे विभागीय कृषी प्रदर्शन शुक्रवारपासून (ता.१८) येथे सुरू होत आहे.
Agricultural Exhibition
Agricultural ExhibitionAgrowon
Published on
Updated on

Sangli News : शेतकऱ्यांसाठी ज्ञानाची कवाडे उघडणाऱ्या दैनिक सकाळ-ॲग्रोवनचे विभागीय कृषी प्रदर्शन शुक्रवारपासून (ता.१८) येथे सुरू होत आहे. सांगली-मिरज रस्त्यालगत असणाऱ्या अंबाबाई तालीम संस्थेच्या मैदानावर सोमवारपर्यंत (ता.२१) कृषी ज्ञानाचा जागर या प्रदर्शनाच्या निमित्ताने होईल. एकाच छताखाली विविध पिकांच्या व्यवस्थापनेबाबतची माहिती या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Agricultural Exhibition
Agriculture Exhibition : बीडच्या कृषी प्रदर्शनासाठी शेतकरी भेटीचे जिल्ह्यांना टार्गेट

गेल्या काही वर्षापासून सातत्याने बदलत्या हवामानामुळे, विविध रोग किडींच्या प्रादुर्भावामुळे विविध पिकांचे अपेक्षित उत्पादन शेतकऱ्याला मिळत नाही. सातत्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. याच अनुषंगाने शेतकऱ्यांना ‘ॲग्रोवन’च्या प्रदर्शनातून मार्गदर्शन मिळणार आहे. निसर्ग क्रॉप केअर इंडिया प्रा. लि. प्रस्तुत सकाळ-ॲग्रोवन ॲग्री एक्स्पो २०२४ चे पॉवर्ड बाय गोदरेज ॲग्रोवेट, नेचर केअर फर्टिलायझर्स प्रा. लि, मे. बी. जी. चितळे डेअरी, भिलवडी आहेत. तर धानुका ॲग्रीटेक लि, व आयडियल ॲग्री सर्च प्रा. लि. हे सहप्रायोजक आहेत.

Agricultural Exhibition
Baramati Agriculture Exhibition : एक झाड फळ मात्र दोन! एआयची करामत

द्राक्ष, डाळिंब, ऊस, केळी, ड्रॅगन फ्रूट या नगदी पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतची माहिती मिळणार आहे. याशिवाय या पिकांच्या अडचणींची चर्चाही विविध तज्ज्ञांच्या व्‍याख्यानातून होणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने नावीन्यपूर्ण शेती अवजारे-यंत्रे, खते, बी-बियाणे, कीटकनाशके, डेअरी, ठिबक आणि तुषार सिंचन शेततळे, कृषी निविष्ठा यादी उत्पादनांचे बदलते नवे तंत्रज्ञान यांसह विविध पिकांच्या उत्पादन वाढीचे तंत्रज्ञानही शेतकऱ्यांना अवगत होणार आहे. अवजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, औषध फवारणी ड्रोन, अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रातील नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.

या प्रदर्शनातून सहभागी कंपन्यांनाही आपल्या उत्पादनांच्या ब्रॅंडिंग बरोबरच थेट प्रगतिशील शेतकऱ्यांसमवेत संवादाची चांगली संधी उपलब्ध होणार आहे. राज्यभरातील विविध तज्ज्ञ शेतकऱ्यांशी सविस्तर संवाद साधतील. किमान मनुष्यबळाची शेती, रेसिड्यू फ्री पद्धत, या पिकांच्या विक्री व्यवस्थेविषयी मार्गदर्शनही विविध स्टॉलच्या माध्यमातून मिळणार आहे. या प्रदर्शनात मोजकेच स्टॉल उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क : शीतल मासाळ मोबा. ९८८११२९२९३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com