Mung Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Mung Production : तंत्र उन्हाळी मूग लागवडीचे

Team Agrowon

डॉ. आदिनाथ ताकटे

उन्हाळी हंगामातील स्वच्छ सूर्यप्रकाश व उष्ण हवामान उन्हाळी मूग लागवडीस पूरक ठरते. कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. त्यामुळे उत्पादनही चांगले मिळते. सिंचनाची सोय उपलब्ध असेल तर चांगले उत्पादन मिळू शकते.

लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन निवडावी. पाणथळ, क्षारपड, चोपण तसेच उताऱ्यावरील हलक्या जमिनीत मुगाची लागवड करू नये. साधारणतः ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकाला योग्य असते.

पेरणी पद्धत

जमिनीची खोल नांगरट करून नंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळी सोबत हेक्टरी ५ ते १० टन चांगले कुजलेले शेणखत द्यावे.

पेरणी २० फेब्रुवारी ते १५ मार्च या दरम्यान करावी. उशिरा पेरणी केल्यास हे पीक पावसाच्या तडाक्यात सापडण्याची शक्यता असते.

पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी.

पेरणी करताना दोन ओळींत ३० सेंमी आणि दोन रोपांत १० सेंमी अंतर ठेवावे.

पेरणीसाठी हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे. घरचे बियाणे असल्यास दर ३ वर्षानी बदलावे.

पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास २.५ ग्रॅम थायरम किंवा २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

उगवण चांगली होण्यासाठी आणि रोप अवस्थेतील बुरशीजन्य रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास ४ ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबिअम व स्फुरद विरघळवणारे पीएसबी या जीवाणू संवर्धकाची २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते. रायझोबिअममुळे मुळांवरील गाठी वाढून नत्राची उपलब्धता वाढते.

खत व्यवस्थापन

पेरणीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत व कंपोस्ट खत हेक्टरी १० टन प्रमाणे द्यावे.

पेरणीच्या वेळी हेक्टरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद (४४ किलो युरिया (१ गोणी) व २५० किलो एसएसपी (५ गोणी) किंवा १०० किलो डीएपी द्यावे ) द्यावे. हेक्टरी १५-२० किलो एमओपी दिल्यास उत्पादनात वाढ होते.

आंतरमशागत

पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी हलकी डवरणी करावी. त्यानंतर गरज भासल्यास १० ते १२ दिवसांनी एखादी खुरपणी करावी. शक्यतो पेरणीपासून ३० ते ३५ दिवसांपर्यंत शेत तणविहरीत ठेवावे.

पाणी व्यवस्थापन

पेरणीपूर्वी एक पाणी देऊन वाफसा आल्यावर पेरणी करावी.

पेरणीनंतर पहिल्यांदा ३ ते ४ दिवसांनी हलकेसे पाणी द्यावे.

पहिल्या पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.

पिकास साधारणपणे ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या संपूर्ण कालावधीत द्याव्यात.

विशेषतः पीक फुलोऱ्यात असताना व शेंगा भरताना पाण्याच्या ताण पडू देऊ नये.

विद्राव्य खतांची फवारणी

पीक फुलोऱ्यात असताना युरियाची (२ टक्के) २० ग्रॅम तसेच शेंगा भरत असताना डीएपी (२ टक्के) २० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सुधारित जाती

जातीचे नाव पीक कालावधी उत्पादन

(क्विंटल प्रति हेक्टर) वैशिष्ट्ये

बी.पी.एम. आर-१४५ ६५ ते ७० १२ ते १४ लांब शेंगा, टपोरे हिरवे दाणे, भुरी रोग प्रतिकारक्षम.

वैभव ७०ते ७५ १४-१५ भुरी रोग प्रतिकारक्षम, टपोरे हिरवे दाणे.

पी. के.व्ही. ग्रीन गोल्ड ७०-७५ १०-११ एकाच वेळी पक्वता, भुरी रोग प्रतिकारक्षम.

बी.एम.-२००२-०१ ६५-७० १२-१४ टपोरे दाणे, लांब शेंगा अधिक उत्पादन, भुरी रोग प्रतिकारक्षम.

बी.एम.-२००३-०२ ६५-७० १२-१४ टपोरे दाणे, लांब शेंगा अधिक उत्पादन, भुरी रोग प्रतिकारक्षम.

पी.के.व्ही, ए.के.एम-४ ६५-७० १०-१२ अधिक उत्पादन, मध्यम आकाराचे दाणे, एकाच वेळी पक्वता, भुरी रोग प्रतिकारक्षम.

उत्कर्ष ६५-७० १२-१४ अधिक उत्पन्न, टपोरे हिरवे दाणे

फुले चेतक ६५-७० १२-१५ टपोरे हिरवे दाणे, लांब शेंगा, अधिक उत्पादनक्षम

पुसा वैशाखी ६०-६५ ६-७ उन्हाळी हंगामासाठी योग्य

फुले एम-२ ६०-६५ ११-१२ मध्यम हिरवे चमकदार दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य

बी एम-४ ६०-६५ १०-१२ मध्यम हिरवे चमकदार दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य

एस-८ ६०-६५ ९-१० हिरवे चमकदार दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य

आय.पी.एम.४१०-३ (शिखा) ६५-७० ११-१२ उन्हाळी हंगामासाठी, पिवळा विषाणू प्रतिकारक

आय.पी.एम.२०५-७ (विराट) ५२-५६ १०-११ उन्हाळी हंगामासाठी, पिवळा विषाणू प्रतिकारक

डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८६ (एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT