Jalgaon News : गिरणा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे गिरणा नदीवरील जामदा (ता. चाळीसगाव) येथील बंधाऱ्यावरून सुमारे तीन हजार सहाशे क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. जामदा डावा कालवातून म्हसवा व भोकरबारी मध्यम प्रकल्पाच्या पुनर्भरणासाठी २५० क्यूसेकने विसर्ग जात आहे. .चाळीसगाव तालुक्यात या वर्षी दमदार पावसामुळे छोटे-मोठे नाले व बंधारे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र सध्या गिरणा परिसरात दिसून येत आहे. जामदा (ता. चाळीसगाव) येथील बंधाऱ्यात नाल्यांचे व गिरणा धरणातून पाणी येते. सध्या या बंधाऱ्यावरुन सकाळी ३ हजार ६०० क्युसेस पाणी गिरणा नदीपात्रात सोडले जात आहे. .जामदा डावा कालव्यातून २५० क्युसेसने पाणी सध्या जात असल्याची माहिती जामदा बंधाऱ्यावरील गेट ऑपरेटर सुनील परदेशी यांनी दिली. जामदा भागात या पाण्यामुळे सर्वत्र ऊस व केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येत आहे. गिरणा धरणाच्या उगम क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाऊस बंद असला तरी गिरणा धरण शंभरीच्या जवळ आले आहे. .Khandesh water Storage : खानदेशात जलसाठा मुबलक.गिरणा धरणातून गुरुवारी (ता. ११) सुमारास २ हजार ४४२ क्युसेकने होणारा विसर्ग दुपारी बाराच्या कमी करुन १ हजार २२१ क्युसेक करण्यात आला. सद्यःस्थितीत गिरणा प्रकल्पाचे वक्रद्वार क्रमांक १ हे ३० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे. गिरणा प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले..बंधाऱ्यांमध्ये पाणीगिरणा परिसरात यंदा दमदार पाऊस झालेला असला तरी तालुक्यातील इतर काही भागात मात्र अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. जास्तीच्या पावसाचा कपाशी पिकाला फटका बसला आहे. गिरणा परिसरातील मेहुणबारे गावाजवळचा वाघी नाला सध्या ओसंडून वाहत आहे. तिरपोळे गावाजवळील पाणलोट बंधारा देखील तुंडुंबर भरला आहे. परिसरातील सर्वच लहान मोठे बंधारे सध्या ओसंडून वाहतानाचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे..Water Storage : उपयुक्त पाणीसाठा ८० टक्क्यांवर.‘मन्याड’मुळे सुटला पाण्याचा प्रश्नचाळीसगाव व नांदगाव तालुक्याच्या हद्दीवरील मन्याड धरणातही १०० टक्के जलसाठा झाला आहे. या धरणातील मृतसाठा ४८३ दशलक्ष घनफूट आहे. धरणाच्या बुडीत क्षेत्र २ हजार १७७ एकर म्हणजे ८७१ हेक्टर आहे. .त्यापैकी ४०० एकर क्षेत्र लिफ्टवर भिजते. ज्यामुळे ६ हजार ५०० हेक्टरात खरीप व रब्बी हंगाम निघतो. मन्याडवर अवलंबून असलेल्या गावांच्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला आहे. मन्याड धरणावर अवलंबून असलेल्या गावांमधील सिंचनाचा व काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्त सुटला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.