Rahul Gandhi agrowon
ॲग्रो विशेष

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड; बुलडाणा दौरा रद्द, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केले आवाहन

Rahul Gandhi Buldana : राहुल गांधी यांची बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती ती रद्द करण्यात आली आहे. याबाबत राहुल गांधी यांनी स्वत: 'एक्स' या सोशल मीडियावरून माहिती दिली.

sandeep Shirguppe

Rahul Gandhi Maharashtra Tour : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी (ता.१२) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते. परंतु गांधी यांचे विमान तांत्रिक अडचणीमुळे संभाजीनगर विमानतळावर उतरू शकले नाही. यामुळे त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल झाला. राहुल गांधी यांची बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती ती रद्द करण्यात आली आहे. याबाबत राहुल गांधी यांनी स्वत: 'एक्स' या सोशल मीडियावरून माहिती दिली.

राहुल गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मला आज (ता,१२) चिखलीला यायचे होते. यावेळी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेटायचे होते. यानंतर मी जाहीर सभेला संबोधित करणार होतो. पण विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मी येऊ शकणार नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितलं.

मला माहित आहे महाराष्ट्रातील शेतकरी खूप अडचणींचा सामना करत आहेत. भाजप सरकार सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव देत नाही. मी तुम्हाला शब्द देतो महाविकास आघाडीच्या पाठीशी राहा आम्ही तुमच्या सर्व समस्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करेन अशी राहुल गांधी यांनी माहिती दिली.

मागच्या काही महिन्यात झालेल्या पावसाने बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान महायुती सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत केली नसल्याने बुलडाणा जिल्ह्यात नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे त्यांच्या सभेसाठी मोठ्या संख्येने समर्थक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याची तयारी करण्यात आली होती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election 2024 : मतदानासाठी १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य

Sugarcane Crushing : ‘छत्रपती’चे ११ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Millet Rate : दौंड बाजार समितीत बाजरीच्या दरात सुधारणा

Natural Industries Group : नॅचरल शुगर सात लाख टन ऊस गाळप करणार

Global Warming : तापमान वाढ कसे कमी होणार; याचा अंदाज नाही

SCROLL FOR NEXT