Kolhapur Politics : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूरची फसवणूक : खासदार शाहू छत्रपती

Rajesh Latkar Congress : सामान्य घरातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे, हाच हेतू ठेवून राजेश लाटकर यांना काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिला असल्याचे खासदार शाहू छत्रपती म्हणाले.
Kolhapur Politics
Kolhapur Politicsagrowon
Published on
Updated on

Kolhapur Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने साडेचार हजार कोटींच्या कामाचा प्रारंभ केला. मात्र, प्रत्यक्षात काहीही न देता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरची फसवणूक केली. शंभर कोटींची घोषणा झाली ते १०० कोटी गेले कोठे? असा सवाल करत सामान्य घरातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे, हाच हेतू ठेवून राजेश लाटकर यांना काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिला असल्याचे खासदार शाहू छत्रपती म्हणाले. आज (ता.०९) कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमदेवार राजेश लाटकर यांचा प्रचार प्रारंभ झाला. यावेळी खासदार शाहू महाराज बोलत होते.

खासदार शाहू महाराज म्हणाले, ‘महाविकास आघाडी ही जनतेच्या विकासाचा विचार करणारी आघाडी आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीच विजयी होणार आहे.’ आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर शहरातील ही निवडणूक एकट्या राजेश लाटकर यांची नाही, तर कोल्हापूरची जनता विरुद्ध राजेश क्षीरसागर अशी आहे. राजेश लाटकर हे महाराष्ट्रातील पहिला आमदार असतील जे मोटारसायकलवरून मतदारसंघात फिरतील असे खासदार छत्रपती म्हणाले.’

राजेश लाटकर म्हणाले, ‘खासदार शाहू महाराज, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आपली उमदेवारी मागे घेतली. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हित लक्षात घेऊनच काम करणार आहे.’ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले, ‘पराभूत झाल्यानंतरही राजेश क्षीरसागर यांना उद्धव ठाकरे यांनी महामंडळ दिले. तरीही त्यांनी केलेल्या प्रकाराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे लाटकर म्हणाले.’

Kolhapur Politics
Kolhapur Politics : मुश्रीफांनी गडहिंग्लज साखर कारखाना बंद पाडला, समरजीत घाटगे गटाकडून आरोप

पेठा या कोल्हापूरचा आत्मा आहेत

शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठेसह इतर पेठा कधीही पैशासमोर मान झुकणाऱ्या नाहीत. पेठा, तालमी, फुटबॉल मंडळे म्हणजे कोल्हापूरचा आत्मा आहे. लाटकर यांना याच पेठांमधून मताधिक्य मिळणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

म्हणून काळजी घेणार

‘समाजात काम करताना मला माझ्या आई-वडील, पत्नी, मुलांसमोर मान खाली घालायला लागू नये. यासाठी समाजहिताचे काम करणार आहे. माझ्या मुलांसमोर कोणी मला नावे ठेवू नयेत म्हणून काळजी घेणार असल्याचे लाटकर यांनी जाहीर केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com