PM Modi And Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी, राहुल गांधींच्या प्रचार तोफा धडाडणार; मोदींची पुण्यात, राहुल गांधी यांची बुलडाण्यात सभा

Maharashtra vidhan sabha election 2024 : विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन जाहीर सभा होणार आहेत. तर राहुल गांधींच्या दोन सभा होतील.
PM Modi And Rahul Gandhi
PM Modi And Rahul GandhiAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढला असून प्रचाराच्या तोफा धडधडत आहेत. आज (ता. १२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन सभा तर राहुल गांधी यांच्या दोन सभा होणार आहेत. याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या देखील सभा राज्यात होतील.

राज्यात प्रचाराने राजकीय वातावरण तापले असून प्रचारासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहीले आहेत. १७ तारखेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार असून १८ तारखेपासून प्रचाराच्या तोफा थंडावतील. यामुळे कमी वेळेत अधिका अधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा सर्वच राजकीय पक्षांचा मानस आहे.

PM Modi And Rahul Gandhi
PM Modi Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सोलापूर, पुणे येथे सभा

पंतप्रधान मोदी यांच्या सभा

पंतप्रधान मोदी पाच दिवसात तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, सोलापूर आणि पुण्यात सभा होणार आहेत. सर्वप्रथम ते चिमूर येथे दुपारी १ वाजता जाहीर सभा घेणार आहेत. सोलापुरात दुपारी दोन वाजता मोदी यांची सभा होणार आहे. येथे ते सोलापूर, सोलापूर दक्षिण, सोलापूर उत्तर, अक्कलकोट, माळशिरस, पंढरपूर-मंगळवेढा या सहा मतदार संघांतील भाजपच्या उमेदवारांसाठी सभा घेतील.

तर पुण्यातील एस.पी महाविद्यालयांच्या मैदानवर दुपारी साडेचार वाजता मोदी यांची सभा होणार आहे. गेल्या वेळी येथीलच त्यांची सभा पावसामुळे रद्द करावी लागली होती. पण आता या सभेची जय्यत तयारी झाली असून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारासाठी मोदी पुण्यात सायंकाळी सभा घेतील.

PM Modi And Rahul Gandhi
Vidhansabha Election : सोलापुरात साखर कारखानदारांचा ‘गोतावळा’ निवडणूक आखाड्यात

राहुल गांधी देखील राज्याच्या दौऱ्यावर

याचबरोबर विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील आज राज्याच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. ते काय बोलतात याकडे अख्ख्या राज्याचे लक्ष लागले आहे. तर राहुल गांधी यांच्या चिखली (जि. बुलडाणा) आणि गोंदिया येथे सभा होणार आहेत.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या देखील सभा राज्यात आहेत. शाह यांच्या मुंबईत दोन तर योगी आदित्यनाथ यांच्या अकोला, अमरावती व नागपुरात सभा होणार आहेत.

प्रचाराला उरले पाच ते सहाच दिवस

राज्यात २० तारखेला मतदान तर २३ तारखेला मतमोजणी होणार असून प्रचार १८ तारखेपर्यंतच करता येणार आहे. यामुळे आजपासून जेमतेम पाच ते सहाच दिवस प्रचाराला मिळणार आहेत. यामुळे केंद्रीय नेत्यांपासून राज्यातील महत्वाचे नेते प्रचाराच्या मैदानात दिसत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com