Tawarja Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Tawarja Feeder Canal : ‘कारसा पोहरेगाव’मधून तावरजा फिडर कालवा

Team Agrowon

Latur News : मांजरा धरणात मोठ्या प्रमाणात साठलेल्या गाळाचा आधार घेत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नदीवर ठिकठिकाणी उच्चस्तरीय बंधारे (बॅरेजेस) बांधले. यानंतर धरण व नदीपात्रातून वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा लाभ घेण्यासाठी फिडर कालव्याची संकल्पना पुढे आली.

रायगव्हाण (ता. कळंब) मध्यम प्रकल्पात पाणी आणण्यासाठी फिडर कालवा मंजूर झाला. मात्र, पुढे ही योजना बारगळली. मात्र, याच धर्तीवर आता मांजरा नदीवरील कारसा पोहरेगाव बंधाऱ्यांतून तावरजा मध्यम प्रकल्पात पाणी आणण्यासाठी फिडर कालव्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या मागणीला उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

यामुळे लातूर व औसा तालुक्यातील अनेक गावांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होऊन हरितक्रांती निर्माण होण्याची आशा आमदार पवार यांना आहे. मांजरा धरण व नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात येणारे पाणी कर्नाटकात वाहून जाते. हे अतिरिक्त पाणी अडवून त्यावर उच्चस्तरीय बंधारे उभारल्यानंतर नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी बारमाही पाणी उपलब्ध झाले.

एकीकडे मांजरा धरण व बंधाऱ्यात पाणी येत असताना दुसरीकडे दुसरीकडे काही प्रकल्प कोरडेठाक राहत होते. यामुळे मांजरा धरणातील अतिरिक्त पाणी रायगव्हाण मध्यम प्रकल्पात आणण्याची फिडर कालव्याची संकल्पना पुढे आली व त्याला मंजुरी मिळाली. मात्र, पुढे ही योजना बारगळली. याच धर्तीवर आमदार पवार यांनी तावरजा मध्यम प्रकल्पासाठी योजना पुढे आणली आहे.

मांजरा नदीवरील कारसा पोहरेगाव बंधाऱ्यातून तावरजा प्रकल्पात पाणी आणण्यासाठी फिडर कालवा (वळण योजना) मंजूर करण्याची मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली. त्यानंतर शुक्रवारी (ता. २१) झालेल्या बैठकीत फडवणीस यांनी प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कुमार यांना दिले आहेत.

चाळीस वर्षात तीनवेळा ओव्हरफ्लो

तावरजा मध्यम प्रकल्पाची उभारणी १९८१ मध्ये पूर्ण झाली. प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २७.७२७ दशलक्ष घनमीटर असून प्रकल्प आतापर्यंत केवळ तीन वेळा शंभर टक्के, सहा वेळा ९० टक्केपेक्षा जास्त, ११ वेळा अर्धापेक्षा जास्त तर २० वेळा अर्ध्यापेक्षा कमी भरला. यामुळे उन्हाळ्यात प्रकल्प कोरडा असतो. प्रकल्पातून अनेक गावांना पाणी योजना असून लाभ क्षेत्रात मोठ्या संख्येने साखर कारखाने आहेत. बावीस किलोमीटर लांबीच्या फिडर कालव्यातून पाणी आल्यानंतर प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

‘रायगव्हाण’ला वालीच नाही

मांजरा धरणाच्या पाळूला जोड देऊन त्यातील अतिरिक्त पाणी रायगव्हाण मध्यम प्रकल्पात आणण्यासाठी फिडर कालवा मंजूर झाला. त्याला धरण परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर फिडर कालवा बारगळला. त्यानंतर मांजरा नदीवरील लासरा (ता. कळंब) उच्चस्तरीय बंधाऱ्यांतून जलवाहिनीने पाणी रायगव्हाण प्रकल्पात आणण्याची योजना मंजूर झाली. योजनेचे सर्वेक्षणही झाले. मात्र, त्यावर पुढे काहीच निर्णय झाला नाही. तावरजा फिडर कालव्यासाठी आमदार पवार धावपळ करत असताना बारा वर्षापूर्वीच्या रायगव्हाण योजनेला कोणी वालीच उरला नसल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : हमीभावाने १३ लाख टन सोयाबीनची खरेदी होणार 

Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ऊस गाळप हंगाम एकावेळी, उसाची पळवापळवी थांबणार!

Ration Grain : ई-केवायसी नसल्यास एक नोव्हेंबरपासून रेशन बंद

Kolhapur market committee : कोल्हापूरच्या बाजार समितीत डुक्कर आणि चोरांनी केलं बेजार, आळा घालण्याची मागणी

Cold Storage Facility : जतला शीतगृह, अन्यत्र पायाभूत सुविधा देणार

SCROLL FOR NEXT