Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Water Management: शाश्वत शेती व ग्रामीण समृद्धीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर आवश्यक आहे. मृद व जलसंवर्धन अभियांत्रिकीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी व माती यांचे संरक्षण करून उत्पादनवाढ शक्य होते.
Water Management
Water ManagementAgrowon
Published on
Updated on

कोमल रोकडे, डॉ. रवींद्र बनसोड

Water Conservation Technique: मृद, जलसंवर्धन अभियांत्रिकीमध्ये जलव्यवस्थापन हे एक मूलभूत आणि महत्त्वपूर्ण अंग आहे. या शाखेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि मृदा धूप कमी करून टिकाऊ शेतीस मदत करणे.

जलव्यवस्थापनाची उद्दिष्टे

मृद, जलसंवर्धन अभियांत्रिकीच्या संदर्भात जलव्यवस्थापनाची उद्दिष्टे ही शाश्वत शेती आणि जलसंपत्तीचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. यामध्ये सर्वप्रथम पाण्याचा कार्यक्षम वापर करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे, ज्याद्वारे कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन मिळवले जाते. त्यानंतर, मृदा धूप रोखणे व जलधारण क्षमता वाढवणे यावर भर दिला जातो, कारण धूप झाल्यास मातीची सुपीकता कमी होते, जलसंधारण क्षमतेवर परिणाम होतो.

Water Management
Rural Water Management : लोकसहभागातून जल-मृद्‌संधारणाला गती

भूजल पुनर्भरण हे आणखी एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यामुळे भूगर्भातील जलपातळी टिकवून ठेवण्यास मदत होते. त्याचप्रमाणे, पर्जन्याच्या पाण्याचे संकलन व संचयन करून ते आवश्यकतेनुसार वापरणे हे जलव्यवस्थापनाचे प्रभावी अंग आहे. शेवटी, सिंचन कार्यक्षमतेत वाढ करून पाण्याची नासाडी कमी केली जाते आणि शेतीसाठी आवश्यक त्या प्रमाणात पाणी योग्य पद्धतीने उपलब्ध करून दिले जाते. ही सर्व उद्दिष्टे मिळून जलव्यवस्थापनाला अधिक प्रभावी, शाश्वत व फायदेशीर बनवतात.

प्रमुख तंत्रज्ञान , उपाय योजना

पृष्ठीय जलव्यवस्थापन

 कंटूर बांधणी.गवत, बंधाऱ्याच्या अडथळ्याद्वारे प्रवाह नियंत्रण.

 नाला खोलीकरण व बंधारे, शेततळे.

भूजल व्यवस्थापन

 कूपनलिका, विहीर पुनर्भरण.

 परकोलेशन टँक.स्टोरेज टँक

 रीचार्ज शाफ्ट

सिंचन व्यवस्थापन

 ठिबक सिंचन,तुषार सिंचन.

 रोटेशन सिंचन पद्धती.

 जलक्षमता वाढवणारी शेती पद्धती.

Water Management
Water Management : जलसंपदा विभागाने व्यवस्थापनावरही भर द्यावा

जलसंधारण संरचना

 जलकुंभ, बंधारे, गॅबियन संरचना.

 चेक डॅम्स, लघू पाणी अडथळे.

 कंटूर ट्रेंच आणि प्लॅटफॉर्म.

मॉडेलिंग, सॉफ्टवेअरचा उपयोग

 HEC-HMS : जलप्रवाह मॉडेलिंग

 SWAT : जल आणि मृदा गुणवत्तेचे विश्लेषण

 WEAP : जलवापर नियोजन

 GIS/Remote Sensing : स्थलदृश्य विश्लेषण

जलव्यवस्थापनाचे फायदे

योग्य जलव्यवस्थापनामुळे पावसाचे पाणी संकलित करता येते, ज्यामुळे जमिनीची धूप कमी होते. पोत टिकून रहातो. भूजल पुनर्भरण होऊन विहीर, कूपनलिकेमधील पाणीपातळी स्थिर राहते किंवा वाढते. यामुळे दुष्काळप्रवण भागातही आवश्यकतेनुसार पाण्याची उपलब्धता सुनिश्चित होते.

सुपीक माती टिकून राहत असल्यामुळे पीक उत्पादनात सातत्य राखता येते. जमिनीचा दीर्घकालीन शेती उपयोग शक्य होतो. परिणामी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, शेती अधिक शाश्वत बनते आणि ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य येते. त्यामुळे मृद व जलसंवर्धन अभियांत्रिकी मध्ये जलव्यवस्थापन ही एक अत्यावश्यक व परिणामकारक प्रक्रिया ठरते.

उदाहरणे

पुणे जिल्ह्यातील पाबळ प्रकल्पात वापरलेली जलसंधारण तंत्रे म्हणजे कंटूर ट्रेंच, शेततळे आणि ठिबक सिंचनामुळे पाण्याचा पातळी वाढून पीक उत्पादनात ३० टक्के वाढ झाली. हिवरे बाजार हे गाव जलव्यवस्थापन व ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातून एक आदर्श उदाहरण मानले जाते. १९९० च्या दशकात हे गाव दुष्काळग्रस्त, पाण्याची टंचाई, बेरोजगारी व स्थलांतर यामुळे ओळखले जात होते. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली या गावाने जलव्यवस्थापनात आमूलाग्र बदल घडवले.

- कोमल रोकडे ७४४८०९९०८८

(पीएचडी रिसर्च स्कॉलर, मृद व जलसंवर्धन अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com