Nandur Madhyameshwar Canal : नांदूर मध्यमेश्‍वर कालव्याला पाणी सोडता येणार नाही

Water Shortage : कार्यकारी अभियंत्याचे लेखी पत्र; शेतकरी आक्रमक
Nandur Madhyameshwar Canal
Nandur Madhyameshwar CanalAgrowon

Vijapur News : वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर : देय कोट्यापेक्षा जास्त पाणी वापर झाला त्यामुळे पाणी सोडता येणे शक्य नाही. असे जवळपास दहा पत्रांचा संदर्भ देत नांदूर मध्यमेश्‍वर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी लेखी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

बुधवारी (ता. ८) कोरड्या जलदगती कालव्यात उतरून बकेटीतील पाण्याने आंघोळ केली. शिवाय उपोषण, ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेत आंदोलनाचे नेतृत्व करणारे पंडित शिंदे व त्यांचे सहकारी नाशिककडे निवेदन देण्यासाठी रवाना झाले.

या संदर्भात अधिक माहितीनुसार, ३ मे रोजी सायंकाळपासून नांदूर मध्यमेश्‍वर जलद गती कालव्यात उन्हाळी आवर्तन सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. मंगळवारी (ता. ७) सायंकाळी अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांच्या व इतर दहा पत्रांचा संदर्भ देत नांदूर मध्यमेश्‍वर कालवा देय कोटा ३११८ दलघफुपेक्षा जास्त पाणी वापर झाल्याने व गोदावरी कालव्यांचे मे २०२४ मधील प्रस्तावित आवर्तनासाठी जेमतेम पाणीसाठा शिल्लक असल्याने नांदूर मध्यमेश्‍वर कालव्याकरिता मागणीनुसार कोणताही पाणीपुरवठा करणे शक्य नाही, असे लेखी कळविले.

Nandur Madhyameshwar Canal
Nandur Madhyameshwar : आला हिवाळा! पर्यटक आणि विदेशी पाहुण्यांनी बहरले नांदूरमध्यमेश्वर

शिवाय ३ मे २०२४ रोजी कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्यासह नाशिक पाटबंधारे विभाग नाशिक येथील अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली.

यामध्ये नांदुर मध्यमेश्‍वर जलद कालव्यास तत्काळ उन्हाळी आवर्तन सोडण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार सुधारित पाण्याची आकडेमोड करण्याबाबत सूचित्त केलेले होते.

या बाबत वरिष्ठ कार्यालयास योग्य तो अहवाल सादर केलेला आहे. त्यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छ. संभाजीनगर यांच्या पत्रानुसार सविस्तर मुद्देनिहाय अहवाल शासनास सादर केलेला आहे.

नांदूर मध्यमेश्‍वर जलद कालव्यास उन्हाळी आवर्तन (वैजापूर, गंगापूर, कोपरगाव) निर्णय घेण्याबाबत प्रकरण शासनास वर्ग करण्यात आलेले आहे. शासनाकडून पुढील निर्देश प्राप्त होताच पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. आता श्री. शिंदे व त्यांचे सहकारी नाशिककडे गेल्याने जवळपास ८० गावांच्या पाणी प्रश्‍नावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com