Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Tanker Water Supply : कोसळत्‍या धारांमध्ये टँकरच्या फेऱ्या

Water Shortage : आठवडाभरापासून दररोज सायंकाळी वादळी पाऊस येत आहे. असे असले तरी तालुक्‍यातील पाणीटंचाई कमी झालेली नाही. भर पावसात काही गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Team Agrowon

Khalapur News : आठवडाभरापासून दररोज सायंकाळी वादळी पाऊस येत आहे. असे असले तरी तालुक्‍यातील पाणीटंचाई कमी झालेली नाही. भर पावसात काही गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील जांबरुंग, जांबरुंग बौद्धवाडी आणि खरवई या तीन ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय वावोशी, रानसई, ढेबेवाडी आणि गर्जेवाडी या आदिवासी वाड्यांमधूनही प्रशासनाकडे टँकरची मागणी करण्यात आली आहे.

बारमाही वाहणारी पाताळगंगा नदी, चार मोठी धरणे, आठ पाझर तलाव एवढी मुबलक जलसंपदा असतानादेखील तालुक्यातील वाड्या-वस्‍त्‍या तहानलेल्‍या आहेत. यंदा खालापूर तालुक्यातील १३ गावे आणि २८ वाड्या टंचाईग्रस्‍त आहेत. २०२४-२५ वर्षात पाणीटंचाई निवारणासाठी २२ लाख २५ हजार रुपये निधीची तरतूद केली आहे.

वयाळ, कोपरी आंबेमाळवाडी, टेंभरीवाडी वावोशी गाव, चिलठण, खानाव, बीड खुर्द, नारंगी, जांबरुंग, खरवई, तळवली, गोरठण, केळवली, गोळेवाडी, रानसई आदिवासी वाडी, ढेबेवाडी बर्गेवाडी, बीड खुर्द आदिवासी वाडी, बीड खुर्द बौद्धवाडी, उंबरविरा ठाकूर वाडी, केळवली वाडी, परखंदे खालची वाडी, परखंदे धनगरवाडी, खैराट धनगरवाडा, वडविहीर कातकरवाडी, वावर्ले ठाकूर वाडी, पाली नरसरी, तीनघर ठाकूर वाडी, नारंगी दत्तवाडी, जांबरुंग बौद्धवाडी, माणिकनगर तळवली, टेंभरीवाडी, सारंग वाडी, कोपरी आंबेमाळवाडी, करंबेळी ठाकूर वाडी, खडईवाडीचा समावेश टंचाईग्रस्त यादीत आहे. त्यापैकी जांबरुंग, जांबरुंग बौद्धवाडी आणि खरवई याठिकाणी टॅंकरने पुरवठा सुरू आहे. वावोशी, रानसई वाडी, ढेबेवाडी आणि गर्जेवाडीकडून टँकरची मागणी करण्यात आली आहे.

सिंचनाचे पाणी व्यावसायिक वापरासाठी

तालुक्यात मोरबा, कलोते मोकाशी, डोणवत आणि भिलवले चार मोठी धरणे तसेच आठ पाझर तलाव आहेत. मोरबे धरण नवी मुंबई महापालिकेच्या ताब्यात आहे. त्यामुळे चौक गाव वगळता मोरबे धरणाचा फायदा खालापूर तालुक्याला होत नाही. सिंचनासाठी असलेले कलोते मोकाशी धरणातून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक कारणासाठी पाणी उचलले जाते.

यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे इमॅजिका पार्क असून दिवसाला पंधरा लाख लिटर पाणीपुरवठा होतो. उर्वरित पाणी धरणाजवळचे फार्महाउस, हॉटेल यांना दिले जाते. डोणवत धरणावर १४ गावांची पेयजल योजना अवलंबून असून कारखान्यांकडूनही उपसा केला जातो.

मागणीप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या सहा ठिकाणी टँकरची मागणी झाली असून तीन ठिकाणी नेहमी टँकर पाठवण्यात येत आहे. उर्वरित ठिकाणी टँकर सुरू करण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
- लहू ढोले, पंचायत समिती, पाणीपुरवठा विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabbi Sowing 2025 : रब्बी हंगामातील पेरणी जोमात; मागील वर्षीच्या तुलनेत ४.५ टक्क्यांनी आघाडी

Farmer ID: अकोल्यातील ४१ हजार शेतकरी फार्मर आयडीपासून लांब

Pomegranate Farming: डाळिंब बागेत पीक संरक्षणासह मधमाशी संवर्धनासह भर

Farmer Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे २.९१ लाख कोटींचे कर्ज प्रलंबित; लोकसभेत केंद्र सरकारने दिली आकडेवारी

Fish Farming: क्षारपड जमिनीत मत्स्य संवर्धनाला मोठी संधी 

SCROLL FOR NEXT