Water Tanker Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : खानदेशात टँकरची समस्या दूर

Water Tanker : खानदेशात पावसाळा चांगला झाला आहे. पुढे पाणी टंचाई नसणार आहे. टंचाई दूर झाली असून, प्रशासनावरचा टंचाईबाबतचा ताण नसल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पावसाळा चांगला झाला आहे. पुढे पाणी टंचाई नसणार आहे. टंचाई दूर झाली असून, प्रशासनावरचा टंचाईबाबतचा ताण नसल्याची स्थिती आहे. पावसाने तापी, गिरणा नदीला प्रवाही पाणी आहे. अनेक प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. शिवारासह शासनाच्या पाणी योजनांचे जलस्रोत बळकट झाले आहेत.

टँकरची समस्या दूर झाली आहे. मागील वर्षी समस्या बिकट होती. जूनमध्येही टँकर वाढले होते. जुलैतही अनेक गावांत टँकर सुरू होते. पण ऑगस्टमध्ये समस्या दूर झाली. जूनमध्ये टँकरच्या संख्येत कुठलीही घट झालेली नसल्याची स्थिती होती. खानदेशात एकूण २२० टँकरद्वारे पाणीपुरवठा जूनपर्यंत होत होता. धुळ्यात सुमारे ६०, नंदुरबारात ५० टँकर होते. नंदुरबार , धुळ्यातील आदिवासी क्षेत्रातही टंचाई होती. दुर्गम भागात टँकर पोचू शकत नसल्याने विंधन विहिरी व अन्य व्यवस्था करून प्रशासनाने पाण्याची समस्या दूर कण्याचा प्रयत्न केला.

धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे ११० गावांत टंचाई होती. नंदुरबारात नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा भागात टंचाई होती. तसेच शहादा तालुक्यातील काही गावांत टंचाई वाढली होती. नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे होती. धुळ्यात साक्री, शिंदखेडा, धुळे भागात टंचाई होती. शिरपूर तालुक्यातही सातपुडा पर्वत भागात टंचाई यंदा वाढली होती. टंचाई निवारणाची व्यवस्था करताना प्रशासनाची जून महिन्यात मोठी धावपळ झाली.

जळगाव जिल्ह्यात सुमारे १०९ गावांत टंचाई होती. तीव्र टंचाईमुळे संबंधित गावांत टँकर सुरू करावे लागले होते. जळगाव जिल्ह्यात सुमारे १४० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात सर्वाधिक ४८ टँकर सुरू होते.

चाळीसगाव तालुक्यातही सुमारे ४६ टँकर सुरू होते. जामनेरात ११ तर जळगाव तालुक्यातही आठ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. जामनेरात विहीर अधिग्रहण कार्यवाहीदेखील झाली आहे. २१ गावांत २१ विहिरी अधिग्रहीत करू न पाणीपुरवठा सुरू आहे.

तर धरणगावातही २० गावांत विहिरींचे अधिग्रहण करू न पाणी दिले जात आहे. भुसावळ तालुक्यात टंचाई कमी होती. पुढे मात्र खानदेशात अपवाद वगळता टंचाई राहणार नाही. प्रशासनाकडून टंचाई आराखडा पुढील महिन्यात तयार होईल. त्यातही निधी व कामाचा ताण अधिकचा राहणार नाही, असे संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Market: खानदेशात केळीच्या आवकवाढीस सुरुवात

local Body Election: पुण्यात ३६.९५, पिंपरी चिंचवडमध्ये ४०.९ टक्के साडेतीनपर्यंत मतदान

Local Body Election: ‘झेडपी’, पंचायत समितीच्या निवडणुकीत राजकारण तापणार

Grape Export: द्राक्ष निर्यातीस कासवगतीने सुरुवात

Agriculture Officer: शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याच्या निलंबनाची शिफारस

SCROLL FOR NEXT