Pune News: राज्यात अळिंबी प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळामार्फत २०२५-२६ मध्ये एकूण २४ नव्या प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे शेतकरी, उद्योजक आणि कृषी प्रक्रिया उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा व बाजारपेठीय जोड मिळवून देण्यासाठी ही प्रकल्पसाखळी निर्णायक ठरणार आहे..अळिंबी ही शक्तिवर्धक, पौष्टिक तसेच औषधी गुणधर्म असलेली वनस्पतीजन्य कवक असून मानवाच्या आहारात तिचे विशेष स्थान आहे. जगभर मागणीमुळे तिची निर्यात क्षमता मोठी असून देशांतर्गत हॉटेल, प्रक्रिया उद्योग तसेच आदिवासी भागातही मागणी आहे. त्यामुळे उत्पादन प्रकल्प अत्यावश्यक आहेत..Mushroom Farming: टेरेसवर कमी खर्चातील मशरूम शेती .अळिंबीसाठी लागणारे बीज उपलब्ध असणे तितकेच महत्त्वाचे असल्याने सरकारने या वर्षी बीजोत्पादन केंद्रे उभारण्यावर भर दिला. यामुळे प्रक्रिया उद्योगांना आवश्यक कच्चा माल उपलब्ध होईल. यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत अळिंबी उत्पादन प्रकल्प हा घटक राबविण्यात येत आहे. त्यासाठी कमी खर्चाच्या कमी उत्पादन प्रकल्पासाठी किमान १ लाख, मोठ्या प्रकल्पासाठी कमाल १२ लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे..प्रकल्पासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रेॲग्रीस्टॅक शेतकरी नोंदणी क्रमांकआधार कार्डजागेच्या मालकीची कागदपत्रे - सात-बारा व आठ अ उताराप्रकल्प भाडेपट्ट्यावर असल्यास नोंदणीकृत भाडेपट्टा करारबँक खात्याच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत (आधार लिंक असणे आवश्यक)संवर्ग प्रमाणपत्र (अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी)सामायिक ७/१२ असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्रबँक कर्ज मंजुरी पत्र.Mushroom Farming: आईच्या प्रेरणेतून साकारलेला मशरूम उद्योग.अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : mahadbtmahait.gov.inयोजना राबविण्याचे उद्देशराज्यात अळिंबी बीजोत्पादनाची छोटी केंद्रे उभारणेअळिंबी प्रक्रिया उद्योगांना दर्जेदार कच्चा माल उपलब्ध करणेबेरोजगार, कृषी पदवीधर, होतकरू तरुण व उद्योजकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणेप्रशिक्षण, उत्पादन आणि बाजारपेठ सुविधा निर्माण करणे.अधिक माहितीसाठी संपर्कप्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळातील प्रकल्प व्यवस्थापक पल्लवी कोंढाळकर, सहायक प्रकल्प व्यवस्थापक सचिन बऱ्हाटे (संपर्क क्रमांक ०२०- २९७०३२२८) तसेच आपल्या संबंधित जिल्ह्यांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे..चालू वर्षी अळिंबी उत्पादन प्रकल्पांना चालना देण्यात येत आहे. २४ प्रकल्पांचे उद्दिष्ट असून त्यासाठी सुमारे १२ लाख रुपयांपर्यत अनुदान देण्यात येणार आहे.- अशोक किरनळ्ळी, संचालक, राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.