Pune News: राज्यात थंडीची लाट कमी झाली असली, तरी सकाळच्या वेळी हुडहुडी कायम आहे. आकाश निरभ्र होत असून तापमानात चढ-उतार होत आहेत. पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानातील वाढ कायम राहील. त्यानंतर पुन्हा गारठा वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत..बंगालच्या उपसागरात ‘डिटवाह’ चक्रीवादळाचे अवशेष असलेले ठळक कमी दाब क्षेत्र निवळले आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्रसपाटीपासून १.५ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून, गुरुवारी (ता. ४) पंजाबच्या अदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३ अंश तापमानाची नोंद झाली..Weather Update : किमान तापमानात घट होण्याची शक्यता.मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा कायम असला, तरी किमान तापमानात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या पुन्हा वर गेला आहे. पहाटे धुक्याची दुलई पसरत असून, हवेत थंडी जाणवत आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ८.६ अंश तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ८.७ अंश सेल्सिअस, तर भंडारा येथे पारा १० अंशांवर आल्याने गारठा कायम आहे..गुरुवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे ३४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका जाणवत असून, उकाड्यात काहीशी वाढ होत आहे. आज (ता. ५) राज्यातील किमान तापमानात वाढ होण्याचा, तसेच थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..Weather Update: राज्यातील तापमानात काहीसे चढ उतार कायम.गुरुवारी (ता. ४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :शहर कमाल किमानपुणे २८.३ १२.९अहिल्यानगर २८.० १२.५धुळे २८.५ ८.७जळगाव २८.४ १२.५जेऊर ३०.५ १२.५कोल्हापूर २९.७ १९.५महाबळेश्वर २४.९ १२.९.मालेगाव २६.४ ११.४नाशिक २७.७ ११.८निफाड २८.८ ८.६सांगली ३०.३ १८.७सातारा ३०.७ १५.५सोलापूर ३१.३ १८.६.Weather Update : किमान तापमानात घट होण्याची शक्यता.सांताक्रूझ ३३.० २०.७डहाणू ३१.८ १८.९रत्नागिरी ३४.५ २३.२छत्रपती संभाजीनगर २९.२ १३.२धाराशिव २७.९ १२.२परभणी २८.४ १४.०परभणी (कृषी) २८.३ ११.३.अकोला २९.४ १३.८अमरावती २९.२ १३.०भंडारा ३०.० १०.०बुलडाणा २८.० १४.०ब्रह्मपुरी ३०.० १३.४चंद्रपूर २९.४ १४.०.गडचिरोली २९.४ १३.४गोंदिया २७.१ १०.२नागपूर २८.५ १२.४वर्धा २९.० १२.४वाशीम २९.० १२.४यवतमाळ २९.५ १२.०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.