Water Crisis : वरखेडे प्रकल्पात जलसंचय यंदाही नाहीच

Water Scarcity : गिरणा पट्ट्यात चाळीसगाव, भडगाव आदी भागांसाठी लाभदायी ठरणाऱ्या गिरणा नदीवरील वरखेडे लोंढे बॅरेज किंवा मध्यम प्रकल्पात यंदाही जलसंचय झालेला नाही.
Water Crisis
Water CrisisAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : गिरणा पट्ट्यात चाळीसगाव, भडगाव आदी भागांसाठी लाभदायी ठरणाऱ्या गिरणा नदीवरील वरखेडे लोंढे बॅरेज किंवा मध्यम प्रकल्पात यंदाही जलसंचय झालेला नाही. या प्रकल्पाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. त्यात यंदा १०० टक्के जलसाठा असेल, असा दावा या वर्षाच्या सुरुवातीला केला जात होता.

वरखेडे लोंढे बॅरेजचे काम गेल्या सरकारने वेगात केले. पण या प्रकल्पाच्या कालव्यांचा मुद्दा अपूर्ण राहिला. हा तिढा सुटला नाही. कालवा बंदिस्त करावा, जलवाहिनीद्वारे शेतात पाणी पोहोचवावे, अशी मागणी शेतकरी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी सतत केली. प्रकल्पाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले.

Water Crisis
Water Crisis : तीन महिने उलटूनही प्रकल्प कोरडेच

त्यात यंदा जलसंचय केला जाईल व त्याचा उपयोग किमान नदीकाठच्या किंवा प्रकल्पानजीकच्या भागातील क्षेत्रात पुनर्भरणासाठी होईल, असे संकेत होते. पण या प्रकल्पात पुरेसा जलसाठाच नाही. १०० टक्के जलसाठा होऊ शकला नाही. या प्रकल्पाच्या मदतीने परिसरातील सुमारे अडीच हजार हेक्टरला लाभ होणार आहे. पण त्याचे काम, जलसाठा निर्णय रखडले आहेत.

Water Crisis
Water Crisis : मराठवाड्यातील आठ लघू प्रकल्प अजूनही कोरडेच

ऊस, भाजीपाला, केळीची शेती या प्रकल्पामुळे वाढू शकते. साखर कारखानादेखील चाळीसगावात भोरसमध्ये सुरू झाला आहे. पण त्यासाठी प्रयत्न अपुरे पडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जलसंचय होऊन पुढे पाणी शेतापर्यंत पोहोचायला हवे. फक्त जलसंचय होऊनही उपयोग नाही, असाही मुद्दा शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

वरखेडे प्रकल्पासंबंधी भूसंपादनाची गरज आहे. तसेच पुढे बंदिस्त जलवाहिनी टाकून कार्यवाही करण्याची गरजही आहे. परंतु याबाबत प्रशासकीय स्तरावर सकारात्मक कार्यवाही दिसत नाही. दोन वर्षांपासून प्रकल्पात जलसाठ्यासंबंधी आवश्यक कार्यवाही रखडली आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी पाठपुरावा करीत आहेत. परंतु प्रशासन व वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जात नसल्याने अडचणी आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com