Parbhani News: मराठवाडा विभागाच्या सुपीकता निर्देशांकानुसार जमिनीमध्ये नत्र व स्फुरद या मुख्य अन्नद्रव्यांची कमतरता आहे. विभागातील ८२ टक्के जमिनी अल्कधर्मी असून सामू ७.५ पेक्षा जास्त आहे. त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील कमतरता आढळून आली आहे. त्यात प्रामुख्याने तांबे, लोह, मंगल, जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी दिली..डॉ. कौसडीकर म्हणाले, की यंदा (२०२५) मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांतून प्रत्येकी १ हजारनुसार ८ हजार माती नमुने संकलित करून परीक्षण करून विश्लेषण करण्यात आले. नत्र, स्फुरद, पालाश या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेनुसार जमीन सुपीकता निर्देशांक तयार करण्यात आले. या अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी म्हणजे १.६७ पेक्षा कमी, मध्यम १.६७ ते २.३३, तर जास्त म्हणजे २.३३ पेक्षा अधिक असे आहे..Soil Health: मातीचे ते मोल किती?.परंतु मराठवाड्यात सरासरी नत्र १.१७, स्फुरद १.४४, पालाश २.६९ असे जमीन सुपीकता निर्देशांक आहेत. त्यानुसार पालाशचे प्रमाण अधिक आहे. परंतु नत्र व स्फुरद या मुख्य अन्नद्रव्यांची कमतरता आहे. तसेच जस्ताची (झिंक) ८६ टक्के जमिनीत, लोह (आयर्न) ४२ टक्के, मंगल (मॅग्निज) १२ टक्के, तांब्याची (कॉपर) १५ टक्के जमिनीत कमतरता आहे. ५२ टक्के जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.४ टक्क्यापर्यंत कमी आहे..शेतकऱ्यांकडील पशुधनाची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शेणखत उपलब्ध होत नाही. एकाच जमिनीत वर्षानुवर्षे एक पीक पद्धतीमुळे मातीच्या एकाच थरातून अन्नद्रव्यांचा उपसा होत आहे. पीक फेरपालटचा अभाव, मूग, उडीद या कडधान्यांच्या लागवडतील घट यामुळे मातीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येत आहे. साखर कारखान्यांची संख्या वाढल्यामुळे ऊस लागवड वाढली. उसाला अतिरेकी पाणी वापरामुळे माती व जमिनीचे आरोग्य खालावत आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये माती तपासणी आधारे खतांच्या मात्रा देण्याबाबत अनास्था आहे. पिकांचे अवशेष जाळून टाकतात..Soil Health: अकोला जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य .त्यामुळे मागील दशकात सुमारे २० टक्के जमिनीतील अन्नद्रव्यांच्या कमतरतेत वाढ झाली आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रामुळे पिकांच्या गरजेनुसार मोजून, मापून पाणी वापर होऊ लागला आहे. त्यामुळे सुपीकता वाढीस लागेल. सुपीकता वाढीसाठी शेतकऱ्यांना सेंद्रिय घटक, भूसुधारक (जिप्सम, तेलबियापेंड), कृषी उद्योगातील उपपदार्थ (बायोगॅस स्लरी, प्रेसमड), हिरवळीचे व जैविक खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. रासायानिक खतांचा पर्यायी म्हणून वापर केला म्हणजे खर्च कमी होईल..निरोगी शहारांसाठी निरोगी मातीची गरजशहरीकरणामुळे हवा, पाणी, माती प्रदूषण वाढले आहे. निरोगी शहारांसाठी निरोगी मातीची गरज आहे. त्यादृष्टीने शहरांमध्ये उद्याने विकसित करण्यासह रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड व संवर्धन करून हिरवळीचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे..अन्नद्रव्यांची कमतरता तसेच रासायनिक खते वापराचा असमतोल यामुळे पिकांचे पोषण व्यवस्थित होत नाही. परिणामी, पिकांची उत्पादकता, गुणवत्ता, कीड-रोग प्रतिकार क्षमता, वातावरणातील बदलास सहनशीलता कमी होत आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य राखून संतुलित पीक पोषण करणे आवश्यक आहे.डॉ. हरिहर कौसडीकर, मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख, वनामकृवि, परभणी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.