Orange Tango Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Tango Variety : विदर्भातील वातावरण टॅंगो वाणासाठी पोषक

Orange Farming : विदर्भासह राज्याच्या काही भागातील वातावरण हे संत्र्याच्या टॅंगो जातीसाठी पोषक असून येत्या दोन वर्षात या टॅंगो वाणाची रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातील.

Team Agrowon

Amaravati News : विदर्भासह राज्याच्या काही भागातील वातावरण हे संत्र्याच्या टॅंगो जातीसाठी पोषक असून येत्या दोन वर्षात या टॅंगो वाणाची रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातील. उत्पादनक्षम असलेल्या या वाणाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पुढे येण्याचे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य मोरेश्‍वर वानखडे यांनी केले.

स्पेन येथील युरो स्माईल कंपनीचे टॅंगो हे अधिकृत पेटंट वाण आहे. कंपनीचे उपाध्यक्ष ज्युऑन ऍनाटिनीओ, जोज मारीया यांनी नुकतीच विदर्भाचा कॅलीफोर्निया असलेल्या वरुड, मोर्शी तालुक्‍यातील संत्रा बागांची पाहणी केली.

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मोरेश्‍वर वानखडे बोलत होते. ॲग्रोव्हिजन फाऊंडेशनचे रवी बोरटकर, किशोर भोंड, नितीन निस्वादे, शशिकांत ऊमेकर, रमेश जिचकार, मनोज जवंजाळ, श्री. धोटे, डॉ. हितेंद्र सिंग, डॉ. उज्ज्वल राऊत, डॉ. विनोद राऊत यांची या वेळी उपस्थिती होती.

बेनोडा येथील श्री. टावरी, टेबुरखेडा येथील गणेश वांदे, तिवसा घाट येथील उद्धव फुटाणे यांच्या संत्रा बागांची पाहणी स्पेनमधील तज्ज्ञांनी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ॲग्रोव्हिजन फाउंडेशनच्या माध्यमातून टॅंगो वाणाचा पुरवठा स्पेनमधील युरो स्माइल कंपनीकडून केला जाणार आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर या भागातील वातावरण या वाणासाठी पोषक आहे किंवा नाही याबाबतची माहिती स्पेनधील संबंधित कंपनीच्या तज्ज्ञांनी घेतली. याच दौऱ्यात स्पेनमधील संत्रा तज्ज्ञांनी मोरेश्‍वर वानखडे यांच्या निवासस्थानी देखील भेट दिली. या वेळी वानखडे कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले.

स्पेनचा केला होता दौरा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कांचन गडकरी यांच्यासह महाऑरेंजचे श्रीधर ठाकरे, मनोज जवंजाळ, राकेश मानकर, पुष्पक खापरे यांच्यासह विदर्भातील अनेक संत्रा बागायतदारांनी काही महिन्यांपूर्वी स्पेनचा दौरा केला होता. मॅग्नेट प्रकल्पाच्या निधीतून याकरिता तरतूद करण्यात आली होती. त्या वेळी स्पेनच्या संबंधित कंपनीशी संत्रा वाण रोपांच्या पुरवठ्याबाबत करार करण्यात आला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yeramala Yatra: येडेश्वरी देवीच्या जयघोषाने दुमदुमली येरमाळानगरी

Satara Agriculture Loss: सातारा जिल्ह्यात गारपीट,वादळी वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान

Hapus Mango Prices: आवक वाढताच हापूसचे दर गडगडले

Electoral Roll Revision: कळंब तालुक्यात मतदार याद्यांचे पुनरीक्षण वेगात

Pre Monsoon Rain: नेवासा, पाथर्डी तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT