Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance News : विम्यासाठी हवामान केंद्रांशी छेडछाड; तक्रार दाखल

Weather Station Tampering : पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी गावांमधील स्वयंचलित हवामान केंद्रांशी होत असलेल्या छेडछाडीबाबत कृषी खात्याने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

मनोज कापडे

Pune News : पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी गावांमधील स्वयंचलित हवामान केंद्रांशी होत असलेल्या छेडछाडीबाबत कृषी खात्याने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. वाशीम जिल्ह्यात पहिली तक्रार दाखल झाली आहे. बीडमध्ये चौकशी सुरू आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

आयुक्तालयाने वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या एका पत्रात या प्रकरणाच्या घडामोडींचा उल्लेख आहे. १३ ते १७ ऑक्टोबर दरम्यान वाशीम जिल्ह्यात कुठेही पाऊस झाला नाही.

मात्र, रिसोडच्या मोप, शिरपूर, मुंगाळा व मालेगावच्या मेडशी, करंजी, चांदस या महसूल मंडळात पावसाची नोंद झाली आहे. मालेगावच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

“जिल्ह्यात कुठेही पाऊस झालेला नाही. पीकविमा योजनेत अवेळी पाऊस झाल्याचे सांगून, स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पीक नुकसानीची सूचना देऊन भरपाई मिळविणे तसेच फळपीक विमा योजनेतून अवेळी पाऊस झाल्याचे सांगून मदत मिळविणे अशा हेतूने काही समाज विघातक घटक हवामान केंद्रांची छेडछाड करीत आहेत.

त्याद्वारे नुकसान भरपाई मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे गंभीर असून चौकशी करून कारवाई करणे आवश्यक आहे,” असे आयुक्तालयाने पोलिसांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे. आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, बोगस नोंदी करण्याच्या या प्रयत्नांमुळे खऱ्या विमाधारक शेतकऱ्यांचेही नुकसान होते आहे.

वाशिमपाठोपाठ बीडच्या गेवराई भागातदेखील असा प्रकार निदर्शनास आला आहे. तेथे चौकशी सुरु असून अंतिम अहवालानंतर गुन्हा दाखल केला जाईल. स्वयंचलित हवामान केंद्रांशी छेडछाड केल्यानंतर तयार झालेल्या पावसाच्या नोंदी रद्द करण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला आहे. त्यामुळे या महसूल मंडळाच्या अखत्यारित पीक नुकसानीबाबत आलेल्या सूचनादेखील रद्द केल्या जातील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT