Taloda Market Committee Election Agrowon
ॲग्रो विशेष

Taloda Market Committee Election : तळोदा बाजार समितीत बिनविरोधची परंपरा टिकणार की खंडित होणार

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या २८ एप्रिलला निवडणूक होणार आहे.

Team Agrowon

Nandurbar News : तळोदा तालुक्यातील सर्वच पक्षातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मागील २० वर्षांपासून बिनविरोध होणारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक (Agriculture Produce Market Committee Election) यंदा देखील बिनविरोध होते की परंपरा खंडित होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

माजी आमदार उदेसिंग पाडवी हे मागील वीस वर्षांपासून बाजार समितीत कारभार पाहत आहेत.

सध्या मात्र विद्यमान आमदार राजेश पाडवी हे देखील बाजार समितीत येण्यास इच्छुक असल्याने आजी माजी आमदार पिता पुत्र कोणती भूमिका घेतात यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.

राजकीय पक्षांची सामंजस्याची भूमिका

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या २८ एप्रिलला निवडणूक होणार आहे. बाजार समितीत एकूण १८ संचालक निवडून द्यावयाचे आहेत. त्यात ग्रामपंचायत मतदारसंघात ४ जागा, सोसायटी मतदारसंघात ११, व्यापारी २ व हमाल मापाडी मतदारसंघात १ जागा आहे.

ग्रामपंचायतीसाठी ६२७ मतदार आहेत, सोसायटी मतदारसंघासाठी ३०० तर व्यापारी मतदारसंघात ८१ व हमाल मापाडीचे ६६ मतदार असे एकूण १०७४ मतदार आहेत. मात्र बाजार समितीत १९९९ ते २००२ या पंचवार्षिक निवडणुकीनंतर निवडणूक झालेली नाही.

निवडणुकीचा खर्च न परवडणारा

बाजार समितीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, माकप अशा सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मागील २० वर्षांपासून संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. त्याचा फायदा बाजार समितीला होत आला आहे.

बाजार समितीची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. त्यामुळे निवडणुकीचा खर्च परवडणारा नसल्याचे म्हटले जाते. त्यामुळे येत्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष कोणती भूमिका घेतात यावर सारे काही अवलंबून असणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rakesh Tikait: महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव होऊ देणार नाही

Contractual Workers: कंत्राटी साखर कामगारांना कायम केल्यास स्थैर्य 

Natural Farming: शाश्वत जीवनशैलीसाठी नैसर्गिक शेती आवश्यक

Urea Supply: राज्यात युरियाचा पुरवठा तातडीने करा: कृषिमंत्र्यांकडून केंद्राला पत्र

Crop Loss: पावसामुळे भिजून कोथिंबीर मातीमोल

SCROLL FOR NEXT