Taloda Market Committee Election
Taloda Market Committee Election Agrowon
ॲग्रो विशेष

Taloda Market Committee Election : तळोदा बाजार समिती अखेर बिनविरोध

Team Agrowon

Nandurbar News : तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती (Taloda Agriculture Produce Market Committee) अखेर बिनविरोध करण्यात सर्वपक्षीय नेत्यांना यश आले असून, सर्वपक्षीय १८ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात भाजपला नऊ, राष्ट्रवादीला सहा, काँग्रेसला एक, शिंदे गटाला एक व ठाकरे गटाला एक जागा मिळाल्याचा दावा करण्यात आला.

दरम्यान, शेवटच्या दिवशी गुरुवारी (ता. २०) तब्बल ३३ जणांनी माघार घेतली. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी नेत्यांना प्रयत्न करावे लागल्याचे बोलले जात आहे.

निवडणुकीसाठी १८ जागांसाठी तब्बल ८६ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली होती. सर्वच पक्षांतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केल्याने डोकेदुखी वाढली होती.

दुसरीकडे सर्वपक्षीय नेत्यांचे एकमेकांना फार्म्यूल्यांवर फॉर्म्यूले पाठविले जात असल्याचे बोलले जात होते. त्यात शेवटी एकमत होऊन माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३३ जणांनी माघार घेतली.

बिनविरोध निवड झालेले संचालक असे

सहकारी संस्था सर्वसाधारण प्रवर्गातून इंद्रजित सुरेश झगडू, योगेश प्रभाकर चौधरी, अमृत तुकाराम मराठे, कल्पेश धरमदास माळी, प्रकाश श्रीराम माळी, रेखा रमेश माळी, हितेंद्र सरवनसिंग क्षत्रिय, महिला राखीव प्रवर्गातून कल्पनाबेन रघुवीर चौधरी, लताबाई प्रल्हाद मराठे, इतर मागास प्रवर्गातून शशिकांत जगन्नाथ वाणी व अनुसूचित जमाती प्रवर्गातून राजेश उदेसिंग पाडवी यांची निवड झाली.

धुळ्यात दोन जागा बिनविरोध...

धुळे जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकींतर्गत गुरुवारी (ता. २०) माघारीच्या अंतिम दिवशी ४१ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले.

त्यात व्यापारी व अडते मतदार संघातून महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार विजय चिंचोले आणि भाजप-भदाणे गटाच्या परिवर्तन पॅनेलचे महादेव परदेशी बिनविरोध विजयी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT