Nashik News: शेतकऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी यांत्रिकीकरणाची गरज आहे. मात्र यांत्रिकीकरण अल्पभूधारक व लहान शेतकरी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात यांत्रिकीकरणासाठी अनुदान देण्याबाबत भरीव तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली..यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र येथे शुक्रवारी (ता. २) आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात श्री. चौहान बोलत होते. या वेळी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, मुक्त विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन,.Agriculture Minister: शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी विक्री योजना: कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान .भारतीय कृषी संधोशन परिषदेचे अतिरिक्त महासंचालक डॉ. राजश्री रॉय बर्मन, भारतीय कृषी संशोधन परिषद-कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था (पुणे) विभागाचे संचालक डॉ. एस. के. रॉय, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शाकीर अली सय्यद, प्रभारी कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे, कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नाईकवाडी, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. नितीन ठोके, यांच्यासह अधिकारी, शेतकरी उपस्थित होते..श्री. चौहान म्हणाले, ‘‘बदलत्या हवामानामुळे पिकांचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी हवामान अनुकूल पिकांचे वाण तयार करण्याचे प्रयत्न कृषी विभागामार्फत सुरू आहेत. आदिवासी भागातील शेतकऱ्यांना तृणधान्यांवर प्रक्रिया उद्योगांसाठी योजना तयार करण्यात येणार आहेत. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी उत्पादनाचे प्रमाणीकरण करणारी स्वतंत्र व विश्वासार्ह यंत्रणा उभारण्यात येणार आहे..Agriculture Scheme: ‘कृषी’च्या योजना अंमलबजावणीत दिरंगाई केल्यास कारवाई: जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण.नव्याने विकसित करण्यात आलेल्या ‘विकसित भारत जी-राम जी’ योजनेअंतर्गत आता प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला १०० दिवसांऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली आहे. काम केल्यानंतर १५ दिवसांत मजुरीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे.’’.भारतीय भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र अमृतकर, वनराज शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष यशवंत गावंडे, प्रगतिशील फूल उत्पादक शेतकरी गणेश वाघ यांनी कृषिमंत्र्यांसमोर यांत्रिकीकरण, शेतीमाल प्रक्रिया उद्योग व संरक्षित शेतीसाठी अनुदान याबाबत प्रश्न उपस्थित केले. ‘यश मायक्रो-न्यूट्रिएंट्स ग्रेड–२’ चे लोकार्पण झाले. मंत्री चौहान यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.