Radhakrishna Vikhe Patil  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Subsidy : शेतकऱ्याला प्रोत्साहनपर अनुदानासाठी ‘स्पेशल ड्राइव्ह’ घ्या

Radhakrishna Vikhe Patil : एकही पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे दिले.

Team Agrowon

Akola News : नियमित कर्ज फेडणाऱ्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ५० हजार रुपये मिळण्यासाठी, प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी ‘स्पेशल ड्राइव्ह’ घ्या. एकही पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे दिले.

जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.२९) दुपारी बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी उपस्थित होते.

अतिवृष्टी अनुदान वितरण कार्यवाही व पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी घेतला. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळाली पाहिजे. पंचनामा प्रकियेत सहकार्य न करणाऱ्या, तसेच कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करा. प्रोत्साहनपर अनुदान प्रत्येक पात्र व्यक्तीला मिळण्यासाठी स्वतंत्र ड्राइव्ह घेऊन कालमर्यादेत कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

ते म्हणाले, की जिल्ह्यात आवश्यक तिथे पांदणरस्ते निर्माण होण्यासाठी मोहीम स्तरावर कामे करावी. पाणंदरस्ते, शिव रस्त्याबाबत कार्यवाही करताना महसूल खात्याने पोलिस बंदोबस्ताची मागणी केली तर तो वेळेत मिळाला पाहिजे. बंदोबस्त पुरविण्याचे अधिकार पोलिस निरीक्षकांना असावेत. जिल्हा कार्यालयाकडे प्रत्येकवेळी परवानगीसाठी फाइल पाठविण्याची गरज पडू नये.

जेणेकरून कार्यवाहीला गती येईल. वाळू धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. लिलाव प्रकिया राबविताना जीएसटी आदी सर्व बाबी सुस्पष्ट असाव्यात व नियमांचे काटेकोर पालन व्हावे.आता प्रत्येक महाविद्यालयात सेतू केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेतला असून,

विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे तिथेच उपलब्ध होणार आहेत. ई-क्लास जमीनीवरील अतिक्रमणे काढण्याबाबत जिल्हा परिषदेने कार्यवाही करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. पुढील बैठक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Monsoon Session 2026: संसदेच्या आवारात विरोधक- सत्ताधारी आमने- सामने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज सलग चौथ्या दिवशी ठप्प

Marathwada Rain: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत हलका ते दमदार पाऊस

Okra Farming: भुसावळात प्रसिद्ध मयूरभाऊंची भेंडी

Desi Cucumber Seeds: अनेक वर्षांपासून जोपासलेले देशी काकडीचे बियाणे

Protest Movement: दगडाहून कठोर हे सरकार

SCROLL FOR NEXT