Government Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Government Scheme : शेतीपूरक व्यवसायासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा

कृषी विज्ञान केंद्र व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यांतर्गत पशुपालकांसाठी चारा प्रक्रिया या विषयावर आयोजित प्रशिक्षणादरम्यान अरोरा यांनी भेट देत शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

Team Agrowon

Akola News : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये अनिश्चिता निर्माण होत असून, शेतकऱ्यांनी शेतीपूरक जोडधंदे करावेत. शेतीपूरक व्यवसायासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा (Collector Nima Arora) यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यांतर्गत पशुपालकांसाठी चारा प्रक्रिया या विषयावर आयोजित प्रशिक्षणादरम्यान अरोरा यांनी भेट देत शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. उमेश ठाकरे, डॉ. गोपाल मंजुळकर, डॉ. गिरीश पंचभाई, किरण दंदी, विजय शेगोकार, सचिन गायगोळ आदी उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर रोपवाटिका प्रकल्प, लाकडी घाणा तेल निर्मिती प्रकल्पाला भेट दिली.

डॉ. मंजुळकर यांनी चारा पिके, त्यांचे नियोजन, लागवड तसेच विविध जातींची माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीत चारा उपलब्धतेची कमतरता, किमतीतील वाढ, त्यामुळे पशुधनावर होणारे आर्थिक नुकसान, हे टाळण्यासाठी चारा प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

डॉ. पंचभाई यांनी निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून जनावरांच्या खाद्यामध्ये वापरल्यास जनावरांची शारीरिक वाढ, दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होत असल्याचे म्हटले. डॉ. ठाकरे यांनी कृषी विज्ञान केंद्राद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

या वेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमास संपूर्ण जिल्ह्यातून २५० पेक्षा अधिक शेतकरी सहभागी होते. गजानन तुपकर यांनी सूत्रसंचालन केले, तर कीर्ती देशमुख यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business: दुग्ध व्यवसायाने पालटेल विदर्भाचे चित्र

Agriculture Startup: ‘स्‍टार्ट अप’चे अंधानुकरण नको

Parliament Protest: कांदाप्रश्‍नी खासदारांचे संसदेसमोर आंदोलन

Lumpy Skin Disease: राज्यात नऊ हजार पशुधनांना ‘लम्पी’

Rain Deficit: पावसाअभावी भाजीपाला शेतीला फटका

SCROLL FOR NEXT