Banana Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Market : केळीची कमी दरात खरेदीप्रकरणी कारवाई करा

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यासह लगत केळीची गेले काही दिवस कमी दरात किंवा बाजार समितीने जाहीर केलेल्या दरांपेक्षा कमी दरात खरेदी करण्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन प्रशासनाने दखल घेतली असून, कमी दरातील खरेदीसंबंधी चौकशी व आलेल्या तक्रारींवर संबंधितांविरुद्ध कारवाईच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

जिल्ह्यात अनेक शेतकरी निर्यातक्षम केळीचे उत्पादन करतात. ज्या केळीची निर्यात परदेशात व इतर भागात होत आहे, त्या शेतकऱ्यांना दर बऱ्यापैकी मिळत आहेत. परंतु कमी दर्जाची केळी व इतर केळी उत्पादकांना रावेर बाजार समिती जे दर जाहीर करते, त्यापेक्षा कमी दर मिळत आहेत. याबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.

रावेरसह जळगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा, भडगाव, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर आदी भागात कमी दरात केळी खरेदीचे प्रकार सुरू आहेत. तसेच अन्य भागातही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. रावेर बाजार समिती केळीचे दर रोज जाहीर करते. परंतु या दरात केळीची खरेदी होत आहे की नाही याबाबत तपासणी, चौकशी कुठेही केली जात नाही.

मध्यंतरी चोपडा, जळगाव बाजार समितीदेखील केळी दर जाहीर करीत होती. परंतु कमी दरात खरेदीचे प्रकार सुरूच होते. या प्रकाराकडे बाजार समित्या व जिल्हा उपनिबंधक विभाग, संबंधित यंत्रणा सतत दुर्लक्ष करीत आहेत. तसेच अनेक व्यापारी विनापरवाना खरेदी करतात.

भरारी पथके नियुक्त करा

यातच याबाबत चौकशीसाठी पथके नेमून थेट शेतांमध्ये तपासणी, शेतकऱ्यांची केळी काढणीदरम्यान भेट घेण्याची आवश्यकता असल्याचे मत शेतकरी उपस्थित करीत आहेत. केळीची खरेदी थेट शिवारात किंवा शेतात केली जाते. यामुळे बाजार समितीत बसूनबसून काहीही उपयोग नाही. कुणी शेतकरी तक्रार घेऊन येणार नाही.

शेतकऱ्यांसमोर केळी विक्री व इतर अडचणीदेखील असतात. शेतकरी उघडपणे बोलत नाहीत, कारण खरेदीदार एकी करून शेतकऱ्यांची कोंडी करतात. यामुळे बाजार समित्या, सहायक निबंधक कार्यालयासह वजन व मापे विभागाने पथक तयार करून ज्या भागात अधिकची केळी काढणी सुरू आहे, त्या भागात चौकशीसत्र राबविण्याची मागणीदेखील होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Oilseed Production : 'राष्ट्रीय खाद्यतेल-तेलबिया अभियाना'ला केंद्रिय मंत्रिमंडळाची मंजूरी; तेलबिया उत्पादन वाढवण्याचं उद्दिष्ट निश्चित

Water Conservation : ‘जीआयएस’ प्रणाली कशी चालते?

Inter Cropping : पूर्वहंगामी उसामध्ये योग्य आंतरपिकांची निवड

Madgyal Sheep : माडग्याळ मेंढीपालकांचे गाव

Ova Crop Cultivation : कमी पाण्यात हमखास उत्पादन देणारं 'ओवा पीक'

SCROLL FOR NEXT